शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चाणक्य नगरीचे गेट अखेर उघडले

By admin | Updated: February 13, 2017 04:46 IST

वहिवाटीचा रस्ता बंद करून निर्माण झालेल्या वादावर अखेर चाणक्य नगरीतील नागरिकांनी पडदा टाकला आहे. नालासोपारा

वसई : वहिवाटीचा रस्ता बंद करून निर्माण झालेल्या वादावर अखेर चाणक्य नगरीतील नागरिकांनी पडदा टाकला आहे. नालासोपारा पश्चिमेकडील चाणक्य नगरीतील कनोज आणि बोधगया या सोसायटीच्या मधील रस्ताबंद करून या सोसायट्यांनी त्या ठिकाणी लोखंडी गेट उभारला होता. त्यामुळे समेळ पाड्याला वळसा घालून उज्जयनी सोसायटीतील लोकांना आपली वाहने हाकावी लागत होती. त्यात रुग्ण,विद्यार्थी,जेष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणात परवड होत होती. जवळचा मार्ग बंद झाल्यामुळे महापालिकेचे सफाई, कामगार, गॅसवाले, पोस्टमन, कुरिअरचे, हॉटेलचे डिलीव्हरी बॉईज उज्जयनीकडे फिरकत नव्हते. त्यामुळे अनेक संकटांचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत होता. हा मार्ग खुला करण्यासाठी स्थानीक नगरसेवक,पोलीस ठाणे आणि महापालिकेकडे साकडेही घालण्यात आले होते. मात्र, या प्रकरणाकडे या सर्वांनी दुर्लक्ष केले होते. रस्ता महापालिकेला हस्तांतरीत केला होता. त्याठिकाणी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून पेव्हर ब्लॉक बसवला होता. पण, रस्ता बंद केल्यानंतर होणाऱ्या त्रासाला कंटाळून येथील महिलांनी उपोषण आंदोलन सुुरु करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कनोज आणि बोधगया सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येवून हा गेट काढून टाकला. त्यामुळे उज्जयनी सोसायटीतील रहिवाशांनी या सोसायटीतील पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. हे प्रकरण सोडवण्यासाठी बोधगयाचे सेके्रटरी विजय अहिरे,कनोजचे रामचंद्र गवळी,उज्जयनीचे अरुण मुळीक, चाणक्यनगरी फेडरेशनचे नितीन पेंढारी आणि नालासोपारा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक सुहास कांबळे यांनी पुढाकार घेवून येथील रहिवाशांची समजूत काढली. त्यामुळेच हे प्रकरण निवळून वादावर पडदा पडला. (प्रतिनिधी)