शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वसई महापालिकेचे गार्डन, तलाव सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 01:32 IST

तीन कोटी रुपये पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सोयी-सुविधांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांची मागणी सुरू आहे. मनपा हद्दीतील अनेक विकासकामे अर्धवट आहेत किंवा अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्यामुळेच अर्धवट राहिली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मनपाने दुर्लक्ष केल्यामुळेच गार्डन आणि तलावाच्या सुशोभीकरणासाठीचे करोडो रुपये पाण्यात गेले आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपये मनपाने खर्च केल्यानंतरही मनपाचे गार्डन, तलाव सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे स्थानिक नागरिक अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.वसई-विरार महानगरपालिकेचे नालासोपारा पूर्वेकडील आचोळे तलावाचे सुशोभीकरण, गार्डनमधील मुलांसाठी लावण्यात आलेले झोके, व्यायाम करण्याचे साहित्य यांच्या दुरुस्तीसाठी ३० जानेवारी २०१९ला २ कोटी ७० लाख ४१ हजार ४३१ रुपयांचे बजेट पास केले होते. या कामासाठी ठेकेदाराला २३० दिवसांचा अवधी देण्यात आला होता. ठेकेदाराने काम करण्यास सुरुवात केली आणि काही दिवसांनी तलावाची भिंत दोन ठिकाणी पडली. त्यामुळे काम थांबवावे लागले. दोन वर्षे उलटूनही तलावाचे काम  सुरू झालेले नाही. तलावाची आणि गार्डनची स्थिती नाजूक झाली असून तुटलेले साहित्य धोकादायक झाले आहे. याबाबत मनपाने लवकरच कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे सांगितले, तर दुर्घटना घडत नाही तोपर्यंत पालिका सुधारणार नाही, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.लॉकडाऊन काळात मनपा क्षेत्रातील तलाव आणि गार्डन सुशोभीकरणाचे काम थांबले होते. गार्डनमध्ये लवकरात लवकर नवीन व्यायामाचे साहित्य आणि लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य लावणार आहे.- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महानगरपालिकासाहित्य तुटलेले गार्डननालासोपारातील सनशाइन गार्डन, आचोळे तलाव, मोरेंगाव तलाव, महेश पार्क, धानिवबाग, वृन्दावन गार्डन, छेडानगर, विरार येथील नाना-नानी पार्क, मनवेलपाडा, बोळींज, वसईतील पापडी, गोखिवरे, वालीव, सातीवली येथील साहित्य तुटलेले आहे.कोट्यवधी रुपये खर्चूनही गार्डनची स्थिती नाजूक आहे. आचोळे तलाव येथील खेळण्याचे व व्यायामाचे साहित्य तुटलेले आहे. लहान मुलांची घसरगुंडी, झोके तुटलेले आहेत. मनपाकडून ठेकेदारांना बजेट पास करून करोडो रुपये दिले जातात, पण अधिकारी याकडे कानाडोळा का करतात?    - विवेक पवार, स्थानिक