वसई : पुढील आठवड्यात येणारा गणेशोत्सव त्या मागोमाग बकरी ईद अशा सणामुळे वसईतील पोलीस यंत्रणेने जिल्हा प्रशासनाकडून पोलीसांची अधिक कुमक मागवली आहे. हे पोलीस मोक्याच्या तसेच संवेदनशील भागात तैनात करण्यात आले आहेत.मुंबई व आसपासच्या परिसरात विविध कारणावरून धार्मिक व सलोख्याचे वातावरण दिवसेंदिवस गढूळ होत चालल्यामुळे पोलीस यंत्रणेने विशेष खबरदारीचे उपाय योजण्यास सुरूवात केली आहे. १७ ते २८ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव व बकरी ईद येत असल्यामुळे वसई विरार भागात पोलीसांची अतिरीक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. हे पोलीस शस्त्रधारी असून संवेदनशील भागात त्यांचा आतापासून जागता पहारा सुरू झाला आहे. गणपती विसर्जन सुरळीत व शांततेत होण्याच्या दृष्टीने पोलीसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. (प्रतिनिधी)
गणेशोत्सव, ईद : वसई विरारमध्ये अतिरिक्त पोलीस कुमक
By admin | Updated: September 12, 2015 22:40 IST