शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गैरप्रकाराबाबत निधी चौधरींवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:24 IST

आयएएस झाल्यावर निधी चौधरी यांना प्रशिक्षणासाठी अंबरनाथ पालिकेत महिन्यासाठी पाठवले होते. या काळात त्यांनी अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली होती.

अंबरनाथ : आयएएस झाल्यावर निधी चौधरी यांना प्रशिक्षणासाठी अंबरनाथ पालिकेत महिन्यासाठी पाठवले होते. या काळात त्यांनी अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली होती. मात्र, त्यातीलच एक भाग त्यांच्या अंगलट आला आहे. या कारवाईदरम्यान त्यांनी पालिकेच्या चार इमारती धोकादायक ठरवत कोणतीही निविदा प्रक्रिया पार न पाडता परस्पर तोडल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याात आला आहे.  या संदर्भात माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले यांनी तक्रार केली होती. सध्या पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या आणि श्रमजीवी संघटनेसोबत वादामुळे चर्चेच्या आलेल्या चौधरी २ मे ते १० जुन २०१४ या काळात अंबरनाथ पालिकेत मुख्याधिकारी पदावर प्रशिक्षणार्थ आल्या होत्या. आयएएस झाल्यावर त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. अवघ्या महिन्यात त्यांनी केवळ शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवर भर दिला होता.  अंबरनाथ पालिकेच्या मालकीच्या भाजी मार्केटसमोरील  परिचारिका इमारत, वडवली वेल्फेअर सेंटर, उलनचाळ वेल्फेअर सेंटर आणि मोरिवली येथील इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या होत्या. मात्र त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट न करता आणि इमारत तोडण्यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेची परवानगी न घेता निधी चौधरी यांनी परस्पर निर्णय घेत ह्या चारही इमारती तोडल्या. एवढेच नव्हे तर इमारत तोडण्यासाठी ठेकेदार नेमण्यासाठी निविदा न काढता परस्पर एका ठेकेदाराला काम देत त्या इमारतीच्या भंगाराच्या मोबदल्यात इमारत तोडून घेतली. चौधरी यांच्यासह तत्कालीन उपमुख्याधिकारी संग्राम नार्वेकर आणि तत्कालीन नगररचनाकार कु. का. धरणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले यांनी या प्रकरणाची तक्रार शासनाकडे केली होती. तसेच बेकायदा कामे केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र त्या प्रकरणात गुन्हा दाखल होत नसल्याने त्यांनी उल्हासनगर न्यायालयात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केली.