वाडा : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आदिवासी विकास विभागाकडून पालघर जिल्हयÞातील रस्ते व पूलांसाठी भरीव निधी देण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी दिली. विक्रमगड-वाडा आणि वाडा-भिवंडी यांना जोडणाऱ्या पुलांसाठी भरीव निधी देण्यात आला आहे. यामध्ये सापने-कावळे (६ कोटी), आमगाव-केव (६ कोटी ५० लाख), ब्राह्मणगाव-कुर्झे (६ कोटी ३० लाख), उचाट-सागाव (३ कोटी), पिंपलास-पिंगेमान (६० लाख), लोहोपे- बंधारपाडा (८० लाख) , भुदानपाडा-पिंपरोली- ठाकरेपाडा (९० लाख), हमरापूर-धुसाळपाडा (१ कोटी) या मोठ्या व मध्यम आकारांच्या पुलांसाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टळणार असून अनेक कि.मी अंतर त्यामुळे कमी होणार आहे. जिल्हा मुख्यालया पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून यामध्ये पालघर-मनोर, मनोर-वाडा-खोडाळा, बोईसर-पालघर,सफाळे-पालघर या रस्त्याचा समावेश असणार आहे. (वार्ताहर)
रस्ते व पुलांसाठी भरीव निधी
By admin | Updated: April 19, 2017 00:01 IST