जव्हार : जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण घेता यावे म्हणून, आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. हा प्रवेश १ ली ते ५ वीमध्ये मिळणार आहे. हा प्रवेश दिनांक ८ मार्च ते २९ मार्चपर्र्यंत प्रवेशिका भरून घेण्याची तारीख आहे. यामुळे नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश मिळण्यासाठी विधवा, घटस्फोटित, निराधार, अपंग पालक, परित्यक्ता असा विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश प्रथम दिला जाणार आहे. पालक शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावे. ग्रामपंचायत दाखला, रहिवासी दाखला, दारिद्रयरेषेखालचा दाखल्याची तपासणी करूनच प्रवेश मिळणार आहे. (वार्ताहर)
आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी शिक्षण
By admin | Updated: March 12, 2016 01:55 IST