शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२४ महिन्यांत पैसे दुपटीचे आमिष देऊन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 00:08 IST

नालासोपाऱ्यात सात आरोपींवर गुन्हा दाखल

नालासोपारा : सोपारा गावात राहणाऱ्या ४० वर्षीय पुरुषाला व इतर साक्षीदारांना एका कंपनीत लाखो रुपये गुंतवणूक करून २४ महिन्यांत दुप्पट पैसे देण्याच्या आमिषाने सात आरोपींनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा पोलिसांनी तक्रार आल्यावर शुक्रवारी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत ८ नागरिकांना फसवल्याचे समोर आले  आहे.

नालासोपारातील सोपारा गावातील एसके अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मोहम्मद हुसेन अब्दुल रहिमान नाईक (४०) व इतर साक्षीदारांची ऑक्टोबर २०१८ ते आजपर्यंत २४ लाख ९२ हजार ५१४ रुपयांची फसवणूक झाली आहे. ओंक्सझोन प्रा. लि. या कंपनीचे भागीदार नजर रसूल बालवा, अमानुल्लाह इस्माईल मोमीन, मोहम्मद आझम खान, सुनील टोणपे यांनी तसेच त्यांचे आणखीन साथीदार जावेद मोईऊद्दीन खान, ऋषी पाल, सतीश शर्मा यांनी त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. मोहम्मद नाईक व इतर साक्षीदारांना त्यांचा कसा नफा होऊ शकेल व २४ महिन्यात दुप्पट पैसे कसे मिळतील याचे आमिष दाखवले. त्याबाबत कंपनीची छापील पत्रके देऊन विश्वासात घेऊन पैसे गुंतविण्यास उत्सुक करून मोहम्मद नाईक यांचे ६ लाख १० हजार रुपये एवढी रक्कम इतर साक्षीदारांचे १८ लाख ८२ हजार ६६५ रुपये अशी एकूण २४ लाख ९२ हजार ५१४ रुपयांची फसवणूक केली. 

आतापर्यंत ८ जणांना फसवल्याचे समोर आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून काही लोकांना फसवले असल्याची शक्यता असून त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.- हिरामण भोये, तपास अधिकारी आणि सहायक पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या