शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबाला सात वर्षांची शिक्षा, दारु सोडवण्याच्या नावाखाली उकळले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 00:31 IST

वाडा : तालुक्यातील तुसे येथे दारूमुक्ती केंद्र चालवणारा भोंदूबाबा आणि त्याच्या अन्य दोन भावांसह तिघांना ठाणे सत्र न्यायालयाने सात वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

वाडा : तालुक्यातील तुसे येथे दारूमुक्ती केंद्र चालवणारा भोंदूबाबा आणि त्याच्या अन्य दोन भावांसह तिघांना ठाणे सत्र न्यायालयाने नरबळी तसेच अमानुष, अघोरी प्रथा आणि जादूटोणा कायद्यान्वये सात वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. नरबळी तसेच जादूटोणा कायद्यान्वये शिक्षा होण्याचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे बोलले जात आहे.तालुक्यातील तुसे गावातील कांतीलाल पुरूषोत्तम देशमुख हा भोंदूबाबा तुसे गावातच दारु मुक्ति केंद्र चालवत असे. या केंद्राच्या माध्यमातून अनेक व्यसनाधीन लोकांकडून त्याने कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली होती. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील देवीदास उत्तम पानसरे हे या भोंदूबाबाकडे दारु सोडविण्यासाठी २०१० पासून येत होते. त्यावेळी त्यांच्या सोबत आलेल्या घरातील महिलांना या भोंदूबाबाने त्याच्या दारूमुक्ती केंद्रातील महादेवाच्या पिंडीजवळ बसवून ठेवले. आणि आपण जो उपाय सांगतो, तो बाहेर कोणालाही सांगितल्यास तुमचा संसार मोडेल. आणि घरातील व्यक्तींचा अपघाती मृत्यू होईल, अशी भीती त्या बायकांना घातली.नवरा दारु प्यायल्यास त्याच्या शरीरावर गुपचूप बिबव्याच्या पेटत्या दिव्यातील तेल पाडून ते लावायला सांगितले. त्यानंतर शरीरावर फोड आल्यास दुसरीकडे उपचारासाठी न जाता आपल्याच केंद्रात आणण्याचा सल्ला दिला. या अघोरी प्रकारानंतर या भोंदूबाबाने अनेकदा गोळ्या खायला दिल्या. आणि २८ हजार ६०० रुपयांसह दर फेरीला हजारो रुपये उकळले. वारंवार, या भोंदूबाबाकडे जाऊनही आपली दारू सुटत नसल्याने आपण फसवले गेलो, याची जाणीव होऊन पानसरे यांनी आॅगस्ट २०१५ मध्ये त्याच्याविरोधात तक्रार केली.आरोपींना ठोठावली शिक्षाठाणे सत्र न्यायालयात सुनावणी होऊन बुधवार, १४ आॅगस्ट रोजी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांनी आरोपींना सात वर्ष कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी केला.

टॅग्स :Courtन्यायालयthaneठाणे