शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

झाईत चौदा तासांचे भारनियमन

By admin | Updated: June 5, 2016 02:51 IST

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई गावात वीज समस्येने कळस केला आहे. गावात प्रतिदिन चौदा तासाचे भारनियमन असून, मागील सहा वर्षांपासून पथदिवे पेटलेले नाहीत. याबाबत महावितरणाच्या

- अनिरुद्ध पाटील,  डहाणू/बोर्डी

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई गावात वीज समस्येने कळस केला आहे. गावात प्रतिदिन चौदा तासाचे भारनियमन असून, मागील सहा वर्षांपासून पथदिवे पेटलेले नाहीत. याबाबत महावितरणाच्या डहाणू कार्यालयात अनेकदा निवेदने देऊनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे संतप्त जमावाने बोर्डी उपकार्यालयात तोडफोड केल्याची घटनाही घडली होती. दरम्यान सीमाभागाला शासन हेतुपूरस्सर डावलत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.महाराष्ट्र गुजरात सीमेवर तलासरी तालुक्यात झाई बोरिगाव ग्रुप ग्रामपंचायत आहे. सागरी आणि डोंगरी भागात एकोणीस पाडे विखुरलेल्या गावची एकूण लोकसंख्या आठ हजार आहे. झाई हे महाराष्ट्रातील आघाडीचे मत्स्य उत्पादन केंद्र असून, पश्चिम घाटाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यांवर नारळ, चिकूच्या मोठ्या बागायती आहेत. मत्स्यव्यवसाय आणि शेती हे व्यवसाय वीजेवरच अवलंबून आहेत. मात्र महावितरणकडून या भागात प्रतिदिन पहाटे ५ ते २आणि सायंकाळी ७ ते १२ अशा चौदा तासांचे भारनियमन केले जाते. त्यामुळे मत्स्य आणि शेतीशी निगडीत व्यावसायिक, कुशल व अकुशल वर्ग देशोधडीला लागले आहेत. जीर्ण खांब, लोंबकळणाऱ्या वाहिन्या यामुळे अपघाताची शक्यता नागरिकांना सतावते आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून गावातील पथदिव्यांना वीज जोडलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत घेवून अंधारात चाचपडत प्रवास करावा लागतो. त्यामुळे साप, विंचू आणि श्वान दंश आदि प्रकार घडतात. या बाबत डहाणू वीज कार्यालयाकडे पाठपुरावा केल्यानंतरही आजतागायत दखल घेतलेली नाही. मात्र या गावचा दिवाबत्तीकर जिल्हा परिषदेकडून वसूल केला जातो आहे. असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. दरम्यान महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई गावाला अनेक शासकीय योजनांपासून डावलले जात असल्याचा आरोप केला जात आहे.समस्येविषयी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र डहाणू वीज कार्यालयाने आजतागायत दखल घेतलेली नाही.- बी. काठे, ग्रामविकास अधिकारी, झाई ग्रामपंचायत मत्स्य व शेती व्यवसाय डबघाईला आले आहेत. जीर्ण वीज यंत्रणेमुळे ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत.- प्रकाश मंगेला उपसरपंच, झाई ग्रामपंचायत