शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

७११ क्लब प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द ठरवला; माजी आमदार मेहतांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 10:50 IST

मीरारोडच्या ७११ क्लब व तारांकित हॉटेल प्रकरणी कांदळवन ऱ्हासाचे दाखल अनेक गुन्हे असताना महापालिकेने नियमात नसताना बांधकाम परवानग्या दिल्याच्या तक्रारी अनेकांनी गेल्या काही वर्षां पासून चालवल्या आहेत . एका याचिकेवर सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून तपास करावा असे आदेश दिले होते . 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - सर्वोच्च न्यायालयाने ७११ क्लब  आदेश रद्द ठरवला असल्याची माहिती भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी पत्रकारांना  दिली आहे . मुंबई उच्च न्यायालयात आम्हाला प्रतिवादी न करता न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. तो आदेश सर्वोच्च न्यायालयाने चुकीचा ठरवल्याचे मेहता म्हणाले . 

मीरारोडच्या ७११ क्लब व तारांकित हॉटेल प्रकरणी कांदळवन ऱ्हासाचे दाखल अनेक गुन्हे असताना महापालिकेने नियमात नसताना बांधकाम परवानग्या दिल्याच्या तक्रारी अनेकांनी गेल्या काही वर्षां पासून चालवल्या आहेत . एका याचिकेवर सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून तपास करावा असे आदेश दिले होते . 

मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन स्थानिक पोलिसां कडे तपास देण्यात आला होता . परंतु स्थानिक तपास अधिकाऱ्याची मेहतांशी  जवळीक असल्याने तपास नीट होत नसल्याचे आरोप तसेच तक्रारी होत होत्या . जानेवारी २०२१ मध्ये  तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखे कडे सोपवल्याने अनेक तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले होते . तर आर्थिक गुन्हे शाखे कडे तपास गेल्या नंतर मेहतांसह सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती . 

महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात बुधवारी नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली . ते म्हणाले कि , सप्टेंबर २०१९ साली मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने माझ्या सह सेव्हन इलेव्हन कंपनी व  यांच्यावर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता . आमच्या कडे सर्व परवानग्या असल्याने तसेच काही केले नसल्याने पोलीस तपासात काही निष्पन्न होणार नाही याचा आम्हाला विश्वास होता . 

परंतु आर्थिक गुन्हे शाखे कडे तपास दिल्याचे कळल्यावर हे राजकीय दबावा खाली केले गेले कि व्यक्तिगत दाबाखाली हे समजले नाही . शेवटी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले असे मेहता म्हणाले . सर्वोच्च न्यायालयाने हे देखील सांगितले कि , आम्ही काही सांगत नाही कि त्यात तथ्य नाही . पण तथ्य आहे तर परत न्यायालयात जा प्रतिवादी करा. मग दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर न्यायालयाने निर्णय द्यावा असे मेहता म्हणाले . यावेळी उपमहापौर हसमुख गेहलोत , सभागृह नेते प्रशांत दळवी . कंपनीचे संचालक प्रशांत केळुस्कर आदी उपस्थित होते . 

न्यायालयाच्या आदेशाने मेहता व त्यांचे समर्थक आनंद व्यक्त करत आहेत . तर ७११ क्लब प्रकरणातील एक तक्रारदार रोहित सुवर्णा म्हणाले कि , न्यायालयाने मेहता वा संबंधितांना क्लीन चिट दिलेली नाही . जर मेहता म्हणतात कि त्यांनी काहीच चुकीचे केले नाही मग ते चौकशीला घाबरले का ? तपास होऊ द्यायचा होता मग सत्य काय ते सर्वां समोर आले असते .