शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मजुरी मागणाऱ्यावर रोखले पिस्तूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 22:56 IST

वनअधिकाऱ्याची दांडगाई; घाबरलेल्या मजुरांना श्रमजीवीचा आधार

वाडा : येथील वनविभाग ( पश्चिम) कार्यालयाच्या क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम काही आदिवासी मजुरांनी काम केले होते. त्या कामाची मजुरी मागायला गेलेल्या या मजुरांवर वनविभाग पश्चिमचे प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे यांनी आपल्याकडील पिस्तूल रोखत दबंगगीरी केल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.तालुक्यातील वनविभाग ( पश्चिम) कार्यालया अंतर्गत येणाºया आबिटघर परिसरातील वनक्षेत्रात शासनाच्या वृक्षलागवडीच्या अभियानाकरिता खड्डे खोदाईचे काम हाती घेण्यात आले होते. या कामावर डिसेंबर २०१८ मध्ये आबिटघर येथील भरत गोविंद जाधव, भाग्यश्री भरत जाधव, आंबो बापू खुताडे, सखाराम गोविंद जाधव या मजूरांनी काम केले होते. या कामाची मजुरी आजवर वनविभागाने दिली नाही. म्हणून हे आदिवासी मजूर मंगळवारी वनविभाग (पश्चिम) कार्यालयात जाब विचारणा करण्यासाठी गेले असता वन परिक्षेत्र अधिकारी तोंडे यांनी मजुरीचे पैसे देण्याऐवजी या मजूरांवर थेट पिस्तुल रोखून धमकावल्याची घटना घडली.या घटनेने भयभीत झालेल्या या आदिवासी मजूरांनी श्रमजीवी संघाटनेच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाणे गाठले असून सायंकाळी उशीरापर्यंत तक्रार नोंदविण्यासाठी हे मजूर व श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ पोलिस ठाण्यात बसून होते. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी तोंडे हे देखील पोलिस ठाण्यात हजर होते. दरम्यान तोंडे हे विक्रमगड येथे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असून वाडा वनविभाग (पश्चिम) चा अतिरिक्त प्रभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यासंदर्भात तोंडे यांच्याशी संपर्क साधला असता मी गनपॉकीट मधुन पिस्तुल काढून माझ्या कमरेला ठेवले. मी कोणत्याही मजुरावर पिस्तुल रोखले नसून माङया विरोधात ते बनाव करीत आहेत. उलट माझ्या वर ते हल्ला करण्याच्या तयारीत होते असा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार