शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

आहाराची बिले रखडली, नऊ महिने झाले दमडाही दिला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:49 IST

जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलना साठी शासन कटिबद्ध असल्याचा आव आणणाºया सरकारनेच, अंगणवाडीतील हजारो मुलांना पोषण आहार पुरविणाºया महिला बचतगटांच्या आहार

हितेंन नाईक पालघर : जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलना साठी शासन कटिबद्ध असल्याचा आव आणणाºया सरकारनेच, अंगणवाडीतील हजारो मुलांना पोषण आहार पुरविणाºया महिला बचतगटांच्या आहार सामग्रीची बिले गेले नऊ महिने थकविली आहेत. त्यामुळे कुपोषण वाढीच्या चिंतेने ग्रस्त झालेल्या शेकडो महिलांनी कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवारी) जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला.या जिल्ह्यातील एकूण ३ हजार १८३ अंगणवाड्या मधील ६ वर्षा खालील मुलांना पूरक आहार पुरविण्याची जबाबदारी महिला बचत गटांकडे सोपविण्यात आली असून त्या आहारात खिचडी, उसळ, लापशी व लाडू आदी चा समावेश असतो. या पोषण आहाराच्या सामग्रीची बिले एकात्मिक बालविकास यंत्रणेने दरमहा अदा करावी अशी अपेक्षा असते. मात्र मागील नऊ महिन्यापासून या बिलांची रक्कम त्यांना अदा करण्यात आलेली नाही.या बिलांची रक्कम आज ना उद्या मिळेल ह्या आशेवर महिलांनी स्वत: कडील पैसे ही खर्च केलेत. तसेच ह्या बालकांचा आहार थांबू नये ह्यासाठी दुकानदारांकडून ही उधारी-उसनवारी करून धान्य, डाळी आणून बालकांचा आहार सुरू ठेवला. मात्र उधारीचा डोंगर वाढू लागल्याने दुकांदारांनीही आता उधारीवर माल देणे बंद केले.परिणामी ह्या पोषण आहाराचे वेळापत्रक बिघडू लागले आणि बालकांना दिवसातून दोन ऐवजी एकाच वेळी आहार मिळू लागला.केंद्राचा निधी आला नसल्याने आणि राज्यानेही स्वत:चा वाटा न दिल्याने ही अवस्था ओढावली आहे. केंद्र व राज्याच्या अर्थसंकल्पात महिला व बालविकासाच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतही मोठी घट केली जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून अंगणवाड्यांचा पोषण आहार पुरविण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद नसण्याची शक्यता ह्यावेळी मोर्चा दरम्यान व्यक्त करण्यात आली. शासन महिला सक्षमीकरणाच्या नुसत्या बाता मारीत असून सरस सारखे उपक्रम राबवून त्यांच्या सक्षमीकरणाचा नुसता डांगोरा पिटला जात आहे तर दुसरीकडे त्यांची बिले मंजूर न करता त्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे काम केले जात आहे. त्यातच प्रति बालका मागे आदिवासी भागात (नवसंजीवनी क्षेत्र) नाममात्र दरवाढ करून शासन त्या दृष्टीने वाटचाल तर करीत नाही ना असाही प्रश्न ह्यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे आज पालघर रेल्वे स्थानकातून कष्टकरी संघटनेचे प्रमुख ब्रायन लोबो, मधू धोडी, पौर्णिमा मेहेर, आदींच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांचा मोर्चा जिल्हापरिषदेवर धडकला. पोलिसांनी तो जिल्हा परिषदेसमोर अडविल्या नंतर ‘आवाज कुणाचा कष्टकरी बायांचा’, सीईओ साहेबाना विचारतात बाया, हमारा पैसे किसने खाया’ अशा घोषणांनी सारा आसमंत महिलांनी दणाणून सोडला.या होत्या मागण्याअंगणवाड्यांना पोषण आहार पुरविणाºया बचत गटांची थकीत बिले तात्काळ अदा करण्यात यावीत.मध्यान्ह भोजन योजनेतील स्वयंपाक्यांचे थकीत मानधन व इतर बिले तात्काळ अदा करण्यात यावीत.ही बिले किंवा त्यातील काही रक्कम जिल्हा परीषद अथवा नियोजन विभाग यांच्या कडील सध्याच्या अखर्चीक रक्कमेतून भागविण्यात यावीत.बचतगटांशी संबंधित आर्थिक व्यवहारात पारदर्शकतेचा अवलंब करण्यात यावा.