शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पाच सराईत दरोडेखोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2015 03:41 IST

पालघर जिल्ह्यात चोऱ्या, दरोडे, गाड्या लुटणे तसेच अपहरण यासारख्या गुन्ह्यांत वाढ होत असल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण होते.

जव्हार : पालघर जिल्ह्यात चोऱ्या, दरोडे, गाड्या लुटणे तसेच अपहरण यासारख्या गुन्ह्यांत वाढ होत असल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण होते. मात्र, जव्हार पोलिसांनी सातत्याने पेट्रोलिंग करून ५ सराईत दरोडेखोरांच्या टोळीला शनिवारी रात्री अटक केली. महादेव शेलार यांचे पथक पेट्रोलिंग करताना यशवंतनगर येथे संशयितरीत्या फिरणारे हे दरोडेखोर जव्हार पोलिसांच्या ताब्यात अडकल्याने अनेक गुन्ह्यांचा छडा लागू शकतो. या पाच जणांना वाडा न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पी.एस.आय. शेलार आणि त्यांचे सहकारी पोलीस पथक रात्री गस्त घालत असताना यशवंतनगर नाक्यावर दोन मोटारसायकल आणि ५ जण संशयितरीत्या उभे असलेले आढळल्याने शेलार यांनी त्यांची चौकशी सुरू केली. त्यात प्रत्येकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकाला संशय आला. त्यांनी त्यांच्याजवळील बॅगा तसेच डिक्की तपासली असता त्यात तीक्ष्ण व घातक हत्यारे, कटावणी, मिरची पावडर आढळल्याने त्यांना तत्काळ जव्हार पो. स्टेशन येथे आणण्यात आले. तेथे पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी सर्व गोष्टी उघड केल्या. वाडा तसेच भिवंडी या भागातील हे गुन्हेगार असून त्यांनी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींची नावे आणि घटना पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर त्यांच्यावर वाडा पोलीस स्टेशनमध्ये अपहरण व खंडणी, विरार पो.स्टे. येथे दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्याने जव्हार पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या तपासणीदरम्यान त्यांनी कुठे व कोणकोणते गुन्हे केले? त्यांचे आणखी साथीदार आहेत का? यासारखी महत्त्वाची माहिती उघड करण्यास अडथळे येऊ नयेत व त्यांचे साथीदार असतील, टोळी असेल तर ते सावध होऊ नयेत म्हणून आरोपींची नावे व फोटो गोपनीय ठेवण्याची विनंती पोलिसांनी प्रसिद्धिमाध्यमांना केली. या गुन्हेगारांनी प्राथमिक स्तरावर दिलेल्या गुन्ह्यांची कबुली व त्यांची व्याप्ती, स्वरूप पाहता मागील काळातील अनेक गुन्हे उघड होऊ शकतात.