शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटांसह भाईंदरमधून पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 20:12 IST

ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई  

मुंबई  -  भाईंदर येथील गोल्डननेस्ट परिसरात नवघर पोलिसांनी सापळा रचून नव्या भारतीय चलनातील बनावट नोटांसह पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हि कारवाई केली आहे. 

पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना मिळलेल्या गुप्त माहितीनुसार नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी भाईंदर येथील गोल्डननेस्ट परिसरात २५ जून रोजी दुपारी ३.२० वाजता सापळा रचला. या ठिकाणी मारुती एर्टिगा (एमएच०२, सीपी १२२७) या खाजगी वाहनातून ४ जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार फैजल हिदरीस शेख, इम्रान अस्लम चारोली, सैय्यदरिझवान अजान सैय्यद, सौऊद सैय्यद सलीम आणि मनीष मेखिया या पाच जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मनीष हा अंधेरीतील गुंदवली भागात राहणार असून इतर आरोपी हे मीरा रोडच्या नया नगर परिसरात राहणारे आहेत. या पाच आरोपींकडून पोलिसांना नव्या भारतीय चलनातील २ हजार रुपयांच्या ५० बनावट नोटा, दोनशे रुपयांच्या १०३ बनावट नोटा अशा एकूण १ लाख २० हजार सहाशे रुपयांच्या  बनावट नोटा जप्त केल्या. तसेच घरझडतीत ४ धारदार तलवारी, १ कुपरी, १ एअर पिस्तूल आणि १ बेस बॉल स्टिक अशी हत्यारे या आरोपींकडे सापडली. हि टोळी गोवा, महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी बनावट नोटा घेऊन निघाली असल्याची माहिती डॉ. महेश पाटील यांनी दिली. त्याचप्रमाणे फैजल या आरोपीच्या वडिलांविरोधात देखील बनावट नोटा सापडल्याने मुंबईत गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असल्याचे पुढे पाटील यांनी सांगितले.