शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पाच नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांचे अभय? केला स्वाक्षरीचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 06:02 IST

निवडणुक जिंकल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र दाखल न केल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेच्या पाच नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात यावा असा प्रस्ताव नगरविकास खात्याने मुख्यमंत्र्यांकडे सादर करून वर्ष उलटले तरी त्यावर मुख्यमंत्र्यांकडून...

- शशी करपेवसई : निवडणुक जिंकल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र दाखल न केल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेच्या पाच नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात यावा असा प्रस्ताव नगरविकास खात्याने मुख्यमंत्र्यांकडे सादर करून वर्ष उलटले तरी त्यावर मुख्यमंत्र्यांकडून सही झालेली नाही. तर यातील एका नगरसेवकाने हायकोर्टाच्या निर्णयाचा फायदा उचलून मुदतीनंतर जातीचा सुधारीत दाखला सादर केल्यानंतर तो जात पडताळणीसाठी पाठवून महापालिकेने त्यांना पाठीशी घातल्याचे उजेडात आले आहे.राखीव जागांवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी सहा महिन्यात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा नगरसेवकांना भूतलक्षी प्रभावाने अपात्र ठरवण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र हेमांगी विनोद पाटील, शबनम आरीफ शेख, अतुल रमेश साळुंखे, समीर जिकर डबरे (सर्व सत्ताधारी बहुनज विकास आघाडी) आणि शिवसेनेचे स्वप्नील अविनाश बांदेकर या पाच नगरसेवकांनी मुदतीनंतर प्रमाणपत्र सादर केले होते. यातील बांदेकर यांनी ४ दिवस उशिरा, अतुल साळुंखे यांनी १४ दिवस उशिरा, शबनम शेख यांनी १८ दिवस उशिरा आणि हेमांगी पाटील यांनी १६ दिवस उशिराने प्रमाणपत्र सादर केले. तर समीर डबरे यांचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र संशोधन अधिकाºयांनी रद्द केल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. या नगरसेवकांनी अपात्र ठरवण्यात यावे यासाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव जिमी घोन्सालवीस यांनी पाठपुुरावा केल्यानंतर वसई विरार महापालिकेचे आयुक्त सतीश लोखंडे यांनी पाच नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव १७ मे २०१६ रोजी नगरविकास खात्याकडे पाठवून दिला होता. हा प्रस्ताव मान्यतेसाठी नगरविकास खात्याचे अवर सचिव अजित कवडे यांनी १८ आॅगस्ट २०१६ रोजी उपसचिवांकडे पाठवून दिला होता. उपसचिव शिंंदे यांनी त्यावर शिक्कामोर्तब करून प्रस्ताव त्याच दिवशी सचिवांकडे पाठवून दिला होता. मात्र, त्यानंतर सदरचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेल्या वर्षभरापासून सहीसाठी प्रलंबित असल्याने तूर्तास नगरसेवकांना जीवदान मिळाले आहे.दरम्यानच्या काळात यातील समीर डबरे यांनी जात वैधता समितीच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले होते. जातीचा दाखला डिफेक्टीव्ह असल्याने त्यात दुरुस्ती करण्याची परवानगी त्यांनी हायकोर्टाकडे मागितली होती. तोपर्यंत अपात्रतेचा निर्णय घेण्यास मनाई हुकुम करण्याची विनंती केली होती.सहा महिन्यांचा होता अवधीवसई विरार महापालिकेची निवडणूक १४ जून २०१५ रोजी झाल्यानंतर मतमोजणी १५ जून २०१५ रोजी झाल्यानंतर १७ जून २०१५ रोजी निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर सहा महिन्यात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे होते. त्यातील ३६ नगरसेवकांनी विहीत मुदतीत प्रमाणपत्र सादर केले होते.हायकोर्टाच्या निर्देशानुसार चार आठवड्याच्या मुदतीत जातीचा दाखला सादर केला आहे. महापालिकेने पडताळणीसाठी पाठवून दिला आहे.- समीर डबरे, नगरसेवकविधी विभागाच्या सल्ल्यानुसार डबरे यांचा जातीचा दाखला वैधता पडताळणीसाठी समितीकडे पाठवण्यात आला आहे.- सुरेंद्र पाटील, सहाय्यक आयुक्त, वसई विरार महापालिकापाचही नगरसेवकांना अपात्र ठरवण्यावर नगरविकास खात्याच्या अधिकाºयांनी शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, बविआच्या तीन आमदारांचा राज्य सरकारला पाठिंबा असल्याने मुख्यमंत्री राजकीय दबावापोटी प्रस्तावर सही करीत नाहीत.- अ‍ॅड. जिमी घोन्सालवीस, प्रदेश सचिव, काँग्रेस

टॅग्स :Vasai Virarवसई विरार