शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदराच्या भूमिपूजनविरोधात भाईंदरमध्ये मच्छीमारांची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 19:19 IST

वाढवण बंदरच्या विरोधात शुक्रवारी उत्तन, भुतोडी बंदर व चौक येथे मच्छीमारांनी निदर्शने केली.

मीरारोड - वाढवण बंदरचे भूमिपूजन ३० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असताना दुसरीकडे त्या निषेधार्थ भाईंदरच्या उत्तन - चौक भागात मच्छीमारांनी काळे झेंडे फडकवत आंदोलन केले. वाढवण बंदरमुळे ३० हजार एकर क्षेत्र मासेमारीसाठी प्रतिबंधित होणार असल्याने मच्छीमारांचा सरकार विरोधातला लढा हा आमच्या अस्तित्वाचा असल्याचे मच्छीमार म्हणाले.

वाढवण बंदरच्या विरोधात शुक्रवारी उत्तन, भुतोडी बंदर व चौक येथे मच्छीमारांनी निदर्शने केली. समुद्रातील बोटींवर सुद्धा मच्छीमारांनी आंदोलन केले. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो, धी डोंगरी चौक फिशरमन सोसायटीचे माजी अध्यक्ष जॉरजी गोविंद, विल्यम गोविंद, उत्तन मच्छिमार व वाहतूक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विंनसंन बांड्या, सचिव बोनावेंचर मालू, अजित गांडोली, अंकलेश कर्तन, आष्टीन नातो, संज्याव पाटील,  माल्कंम कर्तन आदींसह मोठया संख्येने मच्छीमारांनी आंदोलनात सहभाग घेतला.

विशेष म्हणजे, उत्तन सागरी पोलिसांनी काही प्रमुख मच्छीमार नेत्यांना सुमारे एक-दीड तास पोलीस ठाण्यात ताब्यात ठेवले होते. त्यांना नंतर सोडले असले तरी पोलिसांची  पाळत असल्याने मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली. वाढवण बंदर उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ६० पेक्षा जास्त मच्छिमार गावांवर विपरीत परिणाम होणार असून लाखो मच्छिमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत.  ३० हजार एकर क्षेत्र मासेमारीसाठी प्रतिबंधित होणार आहे. तरी देखील अदानीसाठी मच्छीमार व स्थानिक भूमीपुत्रांना उध्वस्त करत वाढवण बंदर सत्तेच्या पाशवी बळावर लादण्याची मोगलाई व ब्रिटिश वृत्ती सरकारची दिसत असल्याचा संताप यावेळी मच्छीमारांनी बोलून दाखवला.

टॅग्स :mira roadमीरा रोड