शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमार सचिन तांडेलचा आंतरराष्ट्रीय क्रीडा पराक्रम, जिद्दीने केली दिव्यांगत्व व आर्थिक विवंचनेवर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 01:11 IST

श्रीलंकेत संपन्न झालेल्या तिसऱ्या एटीटीएफ आंतरराष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत भारताने बाजी मारली. त्यामध्ये डहाणू तालुक्यातील कबड्डीपटू सचिन हरिश्चंद्र तांडेल याने चमकदार कामिगरी केली.

- अनिरु द्ध पाटीलबोर्डी : श्रीलंकेत संपन्न झालेल्या तिसऱ्या एटीटीएफ आंतरराष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत भारताने बाजी मारली. त्यामध्ये डहाणू तालुक्यातील कबड्डीपटू सचिन हरिश्चंद्र तांडेल याने चमकदार कामिगरी केली. या राष्ट्रीय संघात खेळणारा तो राज्यातील एकमेव खेळाडू होता. दरम्यान आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळणारा पालघर जिल्ह्यातील तो पहिला खेळाडू ठरला आहे. नरपड गावातील पंचवीस वर्षीय सचिन ला जन्मत:च पोलिओ झाल्याने, तो दिव्यांग असून डाव्या पायाला हे प्रमाण ४५ टक्के आहे. त्याला शालेय जीवनापासूनच कबड्डीची आवड असल्याने येथील अनंत जनार्दन म्हात्रे विद्यालयातील स्पर्धांमधून त्याने स्वत:ची चमक दाखवली. तर ओम साई कबड्डी संघातील सहकाऱ्यांच्या तालमीचा आणि नरपडच्या या संघाकडून त्याला कबड्डीचे बाळकडू मिळाले. येथ संपादिलेल्या उत्तम कौशल्य व क्रीडा नैपुण्याच्या कामिगरीने पहिल्यांदा जिल्हा, राज्य आणि त्यानंतर राष्ट्रीय दिव्यांग कबड्डी संघात त्याने स्थान मिळवले. नुकतेच त्याने श्रीलंकेतील पॅरा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चौफेर चढाया व अफलातून पकडीच्या जोरावर गुणांची कमाई करीत देशाला अंतिम विजय प्राप्त करून देताना महत्वाची कामिगरी पार पाडली.कर्नाटक येथे पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय दिव्यांग स्पर्धेत महाराष्ट्र संघात खेळतानाही त्याला सर्वोत्तम कबड्डीपटुच्या किताबाने सन्मानीत केले होते. त्या जोरावर राष्ट्रीय संघात त्याला स्थान मिळाले. त्याच्या या आंतरराष्ट्रीय कामिगरीने आशियाई स्पर्धेकरीताही त्याची निवड झाली आहे.नरपड गावातील कोळी मांगेला समाजात त्याचा जन्म झाला असून त्याच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी तो स्पर्धा खेळून आल्यावरही समुद्रात मासेमारीला जातो. तर शिक्षण घेताना, मैदानही गाजवत होता. मात्र बिकट परिस्थितीत बीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याचे सांगतो.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार