शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक संकट, १० महिन्यांत ४० टक्केच वसुली

By admin | Updated: February 4, 2016 01:57 IST

पालिकेने २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात नमूद केलेल्या मालमत्ताकर वसुलीच्या उद्दीष्टापैकी गेल्या १० महिन्यांत केवळ ४० टक्केच कर वसुली झाली असून उर्वरीत

भार्इंदर : पालिकेने २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात नमूद केलेल्या मालमत्ताकर वसुलीच्या उद्दीष्टापैकी गेल्या १० महिन्यांत केवळ ४० टक्केच कर वसुली झाली असून उर्वरीत ६० टक्के वसुलीसाठी अवघे दोन महिने शिल्लक असतानाही प्रशासनाने त्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.पालिका हद्दीत एकुण ३ लाख ५० हजार मालमत्ता असून त्यात निवासी २ लाख ९० हजार तर व्यावसायिक ६० हजार मालमत्ताचा समावेश आहे. निवासी मालमत्तांच्या करमुल्य रक्कमेवर सुमारे ४५ ते कमाल ४८ टक्के व व्यावसायिक मालमत्तावर किमान ४८ ते कमाल ५७ टक्के कर सध्या आकारला जात आहे. पालिकेच्या मुख्य उत्पन्न स्त्रोतांपैकी एक असलेला स्थानिक संस्थाकर राज्य शासनाने बंद केल्याने स्थानिक प्रशासनाचा विकास निधी बहुतांशी मालमत्ताकरावर अवलंबून आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरीता प्रशासनाने चालू अंदाजपत्रकात २३० कोटींच्या कर वसुलीचे उद्दीष्ट ठेवले आहे. या वसुलीवर ठोस कार्यवाही न झाल्याने गेल्या १० महिन्यांत अवघी ९२ कोटी म्हणजेच ४० टक्के एवढीच वसुली झाल्याचे उघडकीस आले आहे. चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सुमारे १ हजार ५०० कोटी इतका असून मूळ उत्पन्न मात्र सुमारे ७०० कोटी इतके दर्शविले आहे. मूळ उत्पन्नाच्या तुलनेत ही वसुली सुमारे १३ टक्के इतकी अल्प असून ती अशीच राहिल्यास त्याचा विपरीत परिणाम शहराच्या विकासासह कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार आहे. उर्वरीत ६० टक्के वसुली फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांत करायची असली तरी त्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. काही आर्थिक वर्षांतील कर वसुली सुमारे ८० टक्के इतकीच झाल्याचे निदर्शनास आले असून त्याप्रमाणे जरी वसुली गृहित धरल्यास गेल्या १० महिन्यांत झालेली ४० टक्के वसुली अवघ्या दोन महिन्यांतच प्रशासनाला करावी लागणार आहे.