शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नवीन वरसावे उड्डाणपूलावरील निकृष्ठ रस्ता खोदण्यास सुरवात

By धीरज परब | Updated: November 26, 2023 20:28 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई - अहमदाबाद महामार्गावर २४७ कोटी खर्चून नवीन उड्डाणपूल बांधला.

मीरारोड - २४७  कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवीन वरसावे उड्डाणपूलचा डांबरी रस्ता निकृष्ठ निघाल्याने आता रस्ता खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.  सदर रस्ता खोदून नव्याने बनवला जाणार आहे. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई - अहमदाबाद महामार्गावर २४७ कोटी खर्चून नवीन उड्डाणपूल बांधला. हा नवीन ४ पदरी पूल २८ मार्च २०२३ रोजी वाहतुकीसाठी खुला केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते. मात्र पुलाच्या पहिल्याच पावसाळ्यात पुलावर अनेक खड्डे पडून रस्त्याखालील लोखंडी सळ्या दिसू लागल्या. जेणे करून कामाच्या दर्जा वरून टीकेची झोड उठली. 

पुलावर खड्डे पडून लोकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण केल्या बद्दल २६ जुलै रोजी काशीमीरा पोलीस ठाण्यात विजय एम. मिस्ञी कन्ट्रक्शन, आशिष शर्मा आणि अशोक थोरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नव्या वरसावे पुलावर अवघ्या तीन महिन्यात खड्डे पडून जवळपास ६८ ठिकाणी सळया बाहेर आल्याने अपघाताची भीती वाढून नागरिक सुद्धा त्रस्त झाले. खासदार राजेंद्र गावित यांनी गडकरी यांना  भेटून नवीन पुलावर खड्डे पडल्या बद्दल तक्रार केली होती. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपूल वरच्या रस्त्याच्या  कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी दिल्ली वरून तज्ज्ञांचे पथक पाठवले होते. पथकाने प्रत्यक्ष पाहणी करत कामाचे नमुने तपासणी साठी घेतले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रोड अँड हायवे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामार्ग यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान उड्डाणपूलावरील निकृष्ठ कामा बद्दल प्राधिकरण ने आता रस्ता खोदून पुन्हा नव्याने रस्ता बांधकाम करण्याचे सुरू केले आहे.  यामुळे काम पूर्ण होई पर्यंत पुन्हा वाहतूक कोंडी होणार आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार