शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

अखेर वसईत साकाणार १०० खाटांचे रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 05:33 IST

मुख्यमंत्र्यांचे आदेश : अंतिम मंजुरीसाठी ४२ कोटीचे अंदाजपत्रक आरोग्यविभागाला सादर

सुनिल घरत

पारोळ : वसई तालुक्याची वाढती लोकसंख्या पाहता येथील जनतेला सरकारी आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे. गेल्या २८-३० वर्षात वसई विरार तालुक्याचे नागरीकरण प्रचंड झाले तरी एकही सुसज्ज सरकारी रुग्णालय उभे राहिले नाही. वसईत व विरारमध्ये १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय सरकारने तात्काळ मंजूर करावे व त्याचे काम जलदगतीने सुरु करावे, अशी मागणी जनतेने केली आहे. याबाबत स्थानिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. त्यावर त्यांनी तात्काळ कार्यवाहीच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

वसई रोड पश्चिमेला मौजे नवघर येथे सध्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परीसरात साधारण ५८ गुंठे जागेत नवे १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय साधारण तीन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात या जागेत उपजिल्हा दर्जाच्या रुग्णालयाचे कोणतेही काम आजवर सुरू होऊ शकलेले नाही. तालुक्याची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे हे उपजिल्हा रूग्णालय आजवर मार्गी लागणे गरजेचे होते. सध्या नवघर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू असून या केंद्राद्वारे किरकोळ आजावरांवर प्रथमोपचार केले जातात. तेथे उपजिल्हा रूग्णालय उभे राहिल्यास सर्व गंभीर आजारांवर उपचार व शस्त्रक्रीया होऊ शकतील.वसई रोड पश्चिमेला मौजे नवघर येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्याच्या कामाचे अंदाजपत्रक व आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडे ८ महिन्यांपूर्वी मंजुरीसाठी पाठविले आहे. नवघर येथील ५८ गुंठे जागेत १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यासाठी तळ अधिक दोन मजली इमारत बांधणे प्रस्तावित आहे. त्यात १०० खाटा, आॅपरेशन रूम व इतर सर्व रूग्णालयाच्या सोयी सुविधा देणे प्रस्तावित आहे. आता याचे काम कधी सुरु होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.वाट पाहावी लागलीच्हे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यासाठी साधारण ४२ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी वसईतील सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारकडे पाठवले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघ यांना दिली. ही सर्व प्रक्रि या गेल्या ३ वर्षात होणे गरजेचे होते. मात्र कुणी हे रुग्णालय व्हावे म्हणून प्रयत्न केले नाहीत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार