शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भराडला ‘सूर्या’चा सेतू कोसळला, पाईप व बांधकामास दिला होता सळ्यांनी आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 03:09 IST

कासा : डहाणूतील सूर्या कालव्यांची दुरूस्ती न झाल्याने कालव्याअंतर्गत येणा-या शेतपिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

शशिकांत ठाकूर कासा : डहाणूतील सूर्या कालव्यांची दुरूस्ती न झाल्याने कालव्याअंतर्गत येणा-या शेतपिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सात वर्षापूर्वी नादुरूस्त झालेला भराड येथील कालव्याचा जलसेतू पूर्ण कोसळला आहे. त्यामुळे त्यापुढील गांवांचा यंदा पाणीपुरवठा बंद होणार आहे.डहाणू तालुक्यातील कासाजवळ सूर्या उजवा कालव्याअंतर्गत लघु कालव्यातून भराड व त्यापुढील गावांना पाणीपूरवठा करण्यासाठी भराड येथे येथे लघु कालव्याला जोडणारा जलसेतू बांधण्यात आला होता. मात्र सात वर्षापूर्वी तो मध्यभागी तुटून त्याची दोन्ही टोके जमिनीवर टेकली होती. त्यामुळे या गावांचा उन्हाळयातील भातशेतीच्या हंगामाचा पाणीपुरवठा बंद झाल्याने जलसंपदा विभागाने तात्काळ पाईप टाकून तात्पुरती व्यवस्था करून दिली. मात्र दरवर्षी लाखो रूपयांची कालव्यांची कामे केल्याचे कागदोपत्री दाखविले जात असतांना या सात वर्षापूर्वी तुटून पडलेल्या धोकादायक जलसेतूची मात्र दुरूस्तीच केली नाही.या जलसेतूचा भाग जमीनीवर टेकून राहिला होता त्यांच्यावरून दोन लघुकालव्यांना पाणी जाण्यास पाईप टाकला होता व या पाईपाला लोखंडी सळयांचा आधार दिला होता. हा आधारही कमकुवत असल्याने महिनाभरापूर्वी पूर्ण पाईप लाईन ही कोलमडून पडली आहे. त्यामुळे महिनाभरात या जलसेतूचे बांधकाम केले नाही तर यंदा भराड व त्यापुढील गावांच्या कालव्यातून होणारा पाणी पुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे त्यांची रोजीरोटी बुडणार असून रोजगारासाठी स्थलांतरीत होण्याची पाळी त्यांच्यावर ओढावणार आहे.>बळीराजाची शेती यंदा ओस पडणारसूर्या कालव्याअंतर्गत उन्हाळयात शेतीला होणाºया पाणीपुरवठयातून कासा, वाणगांव, आदी भागातील शेतकरी पावसाळयाप्रमाणे उन्हाळयातही भातशेती, भाजीपाला आदि पीके घेतात. मात्र भराड व त्यापुढील गावांना जलसेतू कोसळल्याने शेती ओस टाकण्याची पाळी येणार आहे.