शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वसई पालिका आयुक्तांविरुद्ध अवमान याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 23:28 IST

आयुक्तालय निवासस्थानात तोडफोड; गाळ्याचा बेकायदेशीर ताबा

वसई/नालासोपारा : न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिवाणमान येथील आयुक्त निवासस्थानाच्या तळमजल्यावरील गाळ्याचा बेकायदेशीररीत्या ताबा घेऊन तोडफोड केल्याप्रकरणी वसई कोर्टात अवमानना याचिका दाखल करण्यात आली आहे.वसई न्यायालयाचा मनाई आदेश असतानाही हुकूमशाही पद्धतीने आयुक्त गंगाथरन डी. यांनी आयुक्तालयाच्या तळमजल्यावरील गाळा ताब्यात घेऊन त्यात तोडफोड केली, असा आरोप करून गाळाधारक आरिफ चुनावाला यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आयुक्त गंगाथरन, उपायुक्त गिल्सन गोन्साल्वीस व कंत्राटदार बालाजी जाधव यांना तुरुंगात ठेवण्याची आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने कोरोना काळात महापालिकांनी आततायी कारवाई न करण्याचे सुचविले होते. तरीही आयुक्तांनी कारवाई केली, ज्यास वसई कोर्टाने प्रतिबंध केला होता. त्याची पूर्वसूचना मिळूनही त्या जागेत बाहेर पडदा लावून घाईघाईने बांधकाम पूर्ण करण्याचा अट्टाहास सुरू आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील दिगंबर देसाई म्हणाले. त्याबाबतचे पुरावे न्यायालयात दाखल केले आहेत. याबाबत आयुक्तांना संपर्ककेला असता त्यांनी फोन उचलला नाही.हा विषय नेमका काय आहे हे वकीलच सांगू शकतील. याचिकाकर्त्याने अवमानना याचिका दाखल केली आहे, याबाबत आमच्याकडे काहीही माहिती नाही.- गिल्सन गोन्साल्वीस, साहाय्यक आयुक्त, वसई-विरार मनपा