शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पालघर जिल्ह्याच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करा! - सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:32 IST

पालघर जिल्हातील अनेक समस्या सोडविण्यासाठी, जिल्हयाच्या विकासासाठी संघर्ष करा, आपआपसातले वाद बाजूला ठेवून शिवसेनेला मजबूत करा कारण शिवसेना

विक्रमगड : पालघर जिल्हातील अनेक समस्या सोडविण्यासाठी, जिल्हयाच्या विकासासाठी संघर्ष करा, आपआपसातले वाद बाजूला ठेवून शिवसेनेला मजबूत करा कारण शिवसेना ही ८० टक्के समाजसेवा व २० टक्के राजकारण करणारी संघटना असल्याचे मार्गदर्शन राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विक्र मगड येथे आयोजित केलेल्या शिवसेना पालघर जिल्हा मेळाव्यात केले.ते पुढे म्हणाले की शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की ज्या पक्षांनी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला समाजात नाव व प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले आहे तसेच जे शिवसेनेतून निघाले त्याची अवस्था आज काय आहे ती आपण पाहिलीच असेल.सेनेची बांधिलकी ही जनतेशी असून यामुळेच आणि केवळ शिवसेनेमुळेच शेतकºयांची कर्जमाफी होऊ शकली आणि शिवसेनेवर जनतेचा विश्वास असल्यामुळे शिवसेनेत कार्यकर्त्यांचे इनकमिंग आहे आउटगोइंग नाही. पालघर जिल्हाचे पालकमंत्री हे आदिवासी विकास मंत्री असून सुद्धा येथील विकास अजूनही खुंटला आहे. रस्ते, पाणी, रोजगार, कुपोषण यांसारखे विषय अजूनही जैसे थे स्वरूपाचे असून या समस्या सोडवून विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र राहून आगामी होणाºया नगरपालिका, ग्रामपंचायत व इतर निवडणुकीत शिवसेनेचा भगवा कसा फडकेल याचा विचार करा, शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करण्याबाबत ती कधीही मागे हटत नाही, असे मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उपनेते पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांच्या सह पालघर जिल्हा सह संपर्कप्रमुख केतन काका पाटील, पालघर जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे, जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण, ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख. प्रकाश पाटील, पालघर जिल्हा महिला संघटक. ज्योती ठाकरे, आमदार. रुपेश म्हात्रे, आमदार अमित घोडा, आमदार शांताराम मोरे, पालघर जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष . निलेश गंधे, पालघर जिल्हा परीषदेचे शिवसेना गटनेते. प्रकाश निकम, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या मेळाव्यास शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी जिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख आणि लोकप्रतिनिधी आदी मान्यवर यांच्यासह जिल्हातील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.हा जिल्हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पालघर जिल्हा परीषदेचे शिवसेना गटनेते. प्रकाश निकम, विक्रमगडचे तालुका प्रमुख राजा जाधव, शहर प्रमुख सागर आळशी, यांनी मोलाची कामगिरी बजावली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना