शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदरविरोधात लढा तीव्र होणार; आता मोर्चा, रास्ता रोको आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 00:02 IST

संघर्ष समिती आक्रमक, स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असतानाही केंद्र सरकार वाढवण बंदर उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी स्थानिकांची आंदोलने चिरडून टाकली जात आहेत.

शौकत शेखडहाणू : वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत वाढवण बंदर होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला असून वाढवण बंदरविरोधी भडकलेले आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकारने पोलीस बळाचा वापर केला असला, तरी वाढवण बंदरविरोधातील लढा अधिक तीव्र होणार आहे.

वाढवण बंदरविरोधी आंदोलनात आता सर्व मच्छीमार संघटना, आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, कोकण विकास आघाडी तसेच डहाणूच्या पश्चिम भागातील असंख्य गावखेड्यापाड्यांतील ग्रामस्थ सहभागी होऊन लवकरच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे, तसेच रास्ता रोको आंदोलनही छेडण्यात येणार आहे.

स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असतानाही केंद्र सरकार वाढवण बंदर उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी स्थानिकांची आंदोलने चिरडून टाकली जात आहेत. स्थानिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने छेडली जात आहेत. गेल्या शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना, केवळ कोरोना महामारीच्या काळात जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी धरपकड करून ताब्यात घेतले होते. त्याचे तीव्र पडसाद परिसरात उमटू लागले आहेत. या आंदोलनात सर्व संघटनांबरोबरच सर्व सामाजिक संघटना आणि सर्व ग्रामपंचायतींनी पाठिंबा दर्शविला आहे. त्याकरिता लवकरच सर्व संघटनांची एकत्रित बैठक घेऊन त्यांत पुढील आंदोलनाच्या बाबतीत नियोजन केले जाणार आहे. 

सरकारचे लक्ष वेधणारबंदरविरोधी संघर्ष समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, नॅशनल फिशवर्कर्स फोरम, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छीमार संघ यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत बंदरविरोधी आंदोलन अधिक तीव्र करून त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचे, त्याचबरोबर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला,  अशी माहिती वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील यांनी दिली.