शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनिमित्त घोर नृत्योत्सवाची पर्वणी, स्वातंत्र्य पूर्व काळातील परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 05:31 IST

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील डहाणू तालुक्यात दिवाळी सणानिमित्त घोर हा नृत्य प्रकार केले जातात. या वेळी विविध जातीचे, वयोगटातील पुरु ष शृंगार करून नाच करतात.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : महाराष्ट्र गुजरात सीमेवरील डहाणू तालुक्यात दिवाळी सणानिमित्त घोर हा नृत्य प्रकार केले जातात. या वेळी विविध जातीचे, वयोगटातील पुरु ष शृंगार करून नाच करतात.धनत्रयोदशीच्या दिवशी या नृत्याविष्काराला सुरुवात होऊन बलिप्रतिपदेला सांगता होते. येथील स्थानिक गुजराती भाषिक समाजात घोर नृत्योत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. परगावतील पर्यटकांसाठी ही पर्वणीच ठरली आहे. तथापि हा नाच पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढताना दिसत आहे.लोखंडी सळईच्या गोलाकार रिंगणात घुंगरू घातलेले घोर हे पारंपरिक वाद्य आहे. हा पुरुषप्रधान नाचप्रकार असून जोडीदाराच्या साह्याने घोरीच्या तालावर सामूहिक नाच प्रकार आहे. दोन ते तीन प्रकारे फेर धरून तर कधी गुढगा जमिनीला टेकवत नाच केला जातो. एका समूहात बारा ते पंधरा जोड्या असतात. डोक्यावर फेटा, अंगात बणीयान त्यावर लुगड्यांची नक्षीदार जाळी विणली जाते.पांढºया धोतरामुळे व्यक्तिमत्व रु बाबदार दिसते. त्यानंतर झेंडू फुलांच्या माळांनी नर्तकाचा छाती आणि कमरेचा भाग सजवला जातो. कमरेला बांधलेल्या घुंगरूमुळे लयबद्ध संगीत निर्माण होते. डोळ्यात काजळ घातल्याने सौंदºयात भर तर पडतेच व्यक्तिमत्वही रांगडे दिसते. एका हातात दांडिया तर दुसºया हातात मोरपंखाचा गुछा असल्याने हा पेहराव बघ्यांचे लक्ष वेधून घेतो.बगळी (८ ते १० फुट उंच बांबूच्या टोकावर कापडाने बनवलेली बगळ्यांची जोडी) मध्यभागी धरली जाते. कवया (गायक) घोर हे वाद्य हाताच्या मुठीत घेऊन पारंपरिक गाण्यांच्या सुरावतीवर वाजवतो. कवया गाणे गाताना गणपती, राम-कृष्ण आणि ग्रामदैवतांची स्तुतीपर कवण गायली जातात. पारतंत्र्यकाळात इंग्रजांच्या विरूद्ध स्वकीयांना जागृत करण्यासाठी घोर नृत्योत्सवाच्या माध्यमातून जनजागृती व्हायची.

टॅग्स :danceनृत्यdiwaliदिवाळी