शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर खरेदीसाठी वसईमध्ये जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 23:53 IST

सोन्याच्या, कपड्याच्या, गाड्यांच्या शोरूममध्ये उसळली मोठी गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : दिवाळी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण असून खरेदीसाठी शुभमुहूर्त मानला जात असतो. यामुळे आपल्या घरात सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू वा इतर काही तरी नवीन वस्तू यावी यासाठी धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडवा या दिवाळीतील दिवसांच्या मुहूर्तावर खरेदी शुभ मानली जात असल्याने या दिवसात बाजारात मोठी उलाढाल होते. दरम्यान, वसई, विरार, नालासोपारा परिसरात दिवाळीत भाऊबिजेसाठी कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठी गर्दी केली होती.

वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यात या वर्षी कोरोनाचा संसर्ग, आर्थिक मंदी, परतीचा पाऊस याचा फटका बाजाराला बसल्याने खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद कमी आहे. मात्र दुकानदार वेगवेगळ्या सवलती देत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरेदी हा झगमगत्या जीवनशैलीचा दैनंदिन अविभाज्य घटक असला तरी दिवाळीच्या निमित्ताने भरणारी खरेदीची वार्षिक जत्रा कायम आहे. दिवाळीच्या निमित्ताने कपड्यांपासून चीजवस्तूंपर्यंत आणि धान्यापासून मिठायांपर्यंतच्या खरेदीला एकदम तेजी येते.याशिवाय फटाके, रांगोळी, कंदील, रोशणाईचे दिवे यांचा बाजारही भरू लागतो. राहिलेच तर दिवाळसणाच्या मुहूर्तावर दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, गाडी यांच्या खरेदीचेही बेत आखले जातात. गेल्या काही वर्षांत रुजलेल्या मॉल संस्कृतीने दिवाळीनिमित्त बाजारात भरणाऱ्या खरेदीच्या उत्साहात भर घातली आहे. त्यात आता ऑनलाइन शॉपिंगची नवलाई अवतरली आहे. दुकानात जाऊन थेट खरेदी करण्यापेक्षाअशी व्हर्च्युअल खरेदी काहीशी

स्वस्त असल्याने स्मार्ट ग्राहकआता हा पर्याय निवडू लागले आहेत. विशेषत: तरुणवर्ग अशा प्रकारच्या ऑनलाइन शॉपिंगला पसंती देताना दिसत आहेत.वाहन खरेदी जोरातवसई तालुक्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाहन खरेदी जोरात दिसून आली. मंदीचे सावट असतानाही वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. वाहनांचे भाव १० टक्क्यांनी वाढले असतानाही ग्राहकांसाठी वाहनांची बुकिंग मिळत नसल्याचे शोरूम मालकांनी सांगितले.