शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

नियोजनातील चुकांचा वाहनधारकांना फटका

By admin | Updated: January 21, 2015 01:18 IST

वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागाच शिल्लक नाही़ बाजारपेठांच्या ठिकाणी रोडवर वाहने उभी करावी लागत असून या वाहनांवर वाहतूक पोलीस तत्काळ कारवाई करत आहेत़

नामदेव मोरे ल्ल नवी मुंबईनियोजित शहर असल्याचा डिंडोरा पिटणाऱ्या नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागाच शिल्लक नाही़ बाजारपेठांच्या ठिकाणी रोडवर वाहने उभी करावी लागत असून या वाहनांवर वाहतूक पोलीस तत्काळ कारवाई करत आहेत़ रोड पार्किंग व नो पार्किंगच्या नावाखाली वर्षभरात तब्बल ७३,५८१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे़पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आवश्यक लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनतळांची सोय करण्यात आलेली नाही़ नवी मुंबईमध्ये एमआयडीसी, एपीएमसी व इतर औद्योगिक संस्था असून रोज किमान २० हजार ट्रक, डंपर व इतर अवजड वाहने या परिसरात येत असतात़ परंतु या वाहनांसाठी फक्त एकच ट्रक टर्मिनल आहे़ कळंबोली, उरण परिसरामध्येही अशीच स्थिती आहे़ शहरात अनेक ठिकाणी बाजारपेठा तयार करण्यात आल्या आहेत़ हॉटेल, मॉल्स व इतर व्यावसायिक संकुले तयार केली आहेत़ परंतु मार्केट परिसरात वाहने उभी करण्याची सोयच नाही़ नागरिकांना नाईलाजाने रोडवर वाहने उभी करावी लागत आहेत़ रोडवर उभ्या असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस तत्काळ कारवाई करत आहेत़ पोलिसांची टोइंग व्हॅन दिवसभर फिरून मोटारसायकल उचलून नेतात़ चारचाकी वाहनांना टोचन लावून दंड वसूल करत आहेत़ नो पार्किंगच्या नावाखाली दंड भरून अनेक जण त्रस्त झाले आहेत़ अनेक वेळा वाहतुकीस अडथळा नसेल अशा वाहनांवरही कारवाई होत आहे़ यामुळे वाहनधारकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे़ वाहतुकीस शिस्त लागावीपोलीस आयुक्त के . एल़ प्रसाद व वाहतूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरात चांगले काम सुरू केले आहे़ वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठीही चांगले प्रयत्न सुरू आहेत़ नो पार्किंग व रोडवरील पार्किंगवर कारवाई करताना होणारा पक्षपात त्यांनी थांबवावा़ कारवाई वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी असावी, टार्गेट पूर्ण करण्यासाठी नको अशी अपेक्षा नागरिक करू लागले आहेत़ वाहनधारकांप्रमाणे वाहतूक कोंडीस जबाबदार असणारे हॉटेल व इतर व्यावसायिकांवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे़ पार्किंगविषयी पोलिसांच्या कारवाईमधील त्रुटीच्मोटारसायकल व छोट्या वाहनांवर होते कारवाईच्आलिशान वाहनांवर व राजकीय नेत्यांच्या वाहनांवर कारवाई नाहीच्वाहतूक समस्या निर्माण करणाऱ्यांवर कारवाईकडे दुर्लक्षच्पिझ्झा व इतर व्यावसायिकांच्या चुकीच्या पार्किंगकडे दुर्लक्ष च्टोइंग व्हॅनमधील स्पीकरवरून नागरिकांना आवाहन केले जात नाहीच्मॉल व इतर परिसरातील अनधिकृत पार्किंगकडे दुर्लक्ष च्वाहतूक पोलीस पार्किंगची समस्या सोडविण्यापेक्षा कारवाई करून दंड वसूल करण्यास प्राधान्य देत आहेत़ कारवाई करताना मोटारसायकल व छोट्या कारना लक्ष्य करण्यात येत आहे़ मर्सिडीज किंवा इतर मोठ्या वाहनांवर कारवाई केली जात नाही़ वास्तविक ज्या हॉटेल किंवा व्यावसायिकांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे़ च्परंतु संबंधितांवर कारवाई होत नाही़ दोन रांगेत वाहने उभी असतील तर दुसऱ्या रांगेतील वाहनांवर कारवाई होते़ परंतु ज्या ठिकाणी डोमिनो पिझ्झा व व्यावसायिकांची वाहने उभी असतात त्यांच्यावर मात्र काहीच कारवाई होत नाही़ राजकीय व्यक्ती व श्रीमंतांवर अपवाद वगळता कारवाई होत नाही़ यामुळे सामान्य नागरिकांमध्ये विशेषत: दुचाकीस्वारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे़