शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

वसई श्वान निर्बीजीकरण केंद्राची अत्यंत दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 05:27 IST

श्वानांचे मृतदेह कचऱ्यात फेकले : केंद्रचालकाची अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्यासदस्यांना दमदाटी

वसई : वसई महानगरपालिकेचे श्वानांचे ए.बी.सी.नसबंदी सेंटर हे मुलुंड येथील उत्कर्ष स्टार मित्र मंडळाकडून चालविले जाते. त्याचे सेक्रेटरी अ‍ॅड. दगडू लोंढे हे आहेत. ते वसई पूर्वमधील स्मशानभूमीजवळील एका शेडमध्ये असलेल्या या केंद्राची अत्यंत दुर्दशा झाली आहे.

तेथे १२१ पिंजरे आहेत. दररोज या ठिकाणी साधारण १५ श्वानांची नसबंदी करण्यात येते. मात्र दिवाळीच्या कालावधीत या श्वानांची देखभाल करणारे कर्मचारी केंद्राला लॉक लावून रजेवर गेले होते. त्यामुळे गेल्या पाच दिवसात या श्वानांना अन्न पाणी न मिळाल्यामुळे त्यातील दोघांचा मृत्यू शनिवारी झाला होता. तर ३ श्वानांचा मृत्यू तत्पूर्वी झाला होता. यावेळी या केंद्रात ५० पेक्षा जास्त श्वान भुकेमूळे कासाविस झालेले होते. याबाबत अ‍ॅनीमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाचे सदस्य मितेश जैन यांना माहिती मिळताच त्यांनी सहका-यांमार्फत या केंद्रात धाव घेऊन वस्तुस्थिती पाहिली. यावेळी श्वानांची दयनीय अवस्था पाहून अंगावर अक्षरश: शहारे आल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या वाईट परिस्थीतीत या श्वानांना ठेवण्यात आले होते.नसबंदी केल्यानंतर त्यांची स्वच्छता करण्यात आलेली नव्हती. तसेच त्यांना धड अन्न व पाणी ही दिले े नव्हते. अनेकांच्या अंगावर जखमा होत्या. त्यांना मलमपट्टीही केली नव्हती. अधिक चौकशी केली असता चार दिवसाच्या दिवाळी सुटीनंतर रविवारी कर्मचारी कामावर होते.

मितेश जैन यांनी आपले सहकारी बिमलेश नवानी, आरती खुराना, हर्षदा लाड, अमनप्रित वालीया, नंदा महाडीक,बीना सुरज,रवी यांच्यासोबत मृत दोन श्वानांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी परेल येथे पाठविण्याची मागणी केली. मात्र केंद्रचालक अ‍ॅड. दगडू लोंढे याने या कार्यर्क्त्यांना दमदाटी करत मृतदेह घोडबंदर येथील कोरा केंद्रात नेऊन फेकून दिले.याबाबत या कार्यकर्त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवून कोरा केंद्रात जाऊन श्वानांचे मृतदेह ताब्यात घेतले व ते विरारच्या करूणा ट्रस्टच्या रूग्णवाहिकेतून पुन्हा परेल येथे शवविच्छेदनासाठी पाठविले. याबाबत उत्कर्ष ए.बी.सी. केंद्रचालकावर पोलीसांनी व महापालिकेने काय कारवाई करण्यात केली याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.‘‘त्या दोन मृत श्वानांवर नसबंदी शस्त्र क्रि या करण्यात आली होती.त्यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यावर माहिती मिळेल. डॉग स्टीरिलायझेशन व मॉनीटरींग कंपनीमार्फत चौकशी केल्यावर कारवाई करू.- सुखदेव दरवेशी, सहा. आयुक्तमी कोणालाही दमदाटी केलेली नाही.श्वानांचा मृत्यू भुकेमूळे झाला हे खोटे आहे.आंम्ही श्वानांना दररोज चिकन व पेडीग्रीन देत असतो. काही वेळा शस्त्रक्रि येनंतर श्वान मृत होतात.- दगडू लोंढे, केंद्रचालक६ नोव्हेंबर रोजी ३ श्वान व १० नोव्हेंबर रोजी २ श्वानांचा मृत्यू झाला होता.हे प्रकरण दाबण्यासाठी अड. लोंढे यांनी आंम्हाला दमदाटी केली.श्वानांना अन्न पाणी दिले जात नाही हे प्रत्यक्ष आंम्ही पाहिले आहे.-मितेश जैन, अ‍ॅनिमल वे. बोर्ड 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारdogकुत्रा