शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याच्या अटीवर कोलाला अतिरिक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:13 IST

वाड्यात भीषण पाणीटंचाई असतांना शासनाने वैतरणा धरणातून १.३० दशलक्ष घनमीटरचा अतिरिक्त पाणीसाठा कोकाकोला कंपनीसाठी मंजूर करून हे पाणी तत्काळ सोडले आहे.

- वसंत भोईर वाडा : संपूर्ण राज्यासह वाड्यात भीषण पाणीटंचाई असतांना शासनाने वैतरणा धरणातून १.३० दशलक्ष घनमीटरचा अतिरिक्त पाणीसाठा कोकाकोला कंपनीसाठी मंजूर करून हे पाणी तत्काळ सोडले आहे. हे पाणी वाड्याच्या वैतरणा नदीतील सिद्धेश्वरी बंधाऱ्यावर नगरपंचायतीने अडवल्याने कंपनी प्रशासनाकडून अर्ज विनंत्या करून हे पाणी सोडण्याची मागणी केली. परंतु नगरपंचायतीकडून कंपनीची विनंती अमान्य केल्याने कोकाकोला कंपनीचे उत्पादन गेल्या पाच दिवसांपासून बंद होते. काल अखेर नगरपंचायतीचे पदाधिकारी व कंपनी प्रशासन यांच्यात दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका होऊन त्या दरम्यान कंपनी प्रशासन अखेर नरमले आणि त्यांनी नगरपंचायतीची जलशुद्धीकरण केंद्र बसविण्याची मागणी मान्य करून लेखी आश्वासन दिल्याने वाडा नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गेल्या दोन-तीन दिवसांपासून रंगलेल्या उलट सुलट चर्चेला मंगळवारी अखेर पूर्णविराम मिळाला. पाटबंधारे विभागाने वैतरणा नदीतवर गांधरे येथे बांधलेला बंधारा कोरडा पडल्याने गेल्या पाच दिवसांपासून कोकाकोला कंपनीवर उत्पादन बंद करण्याची नामुश्की ओढवली होती. याची दखल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घेऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने अप्पर वैतरणा धरणातून अतिरिक्त पाणीसाठा तत्काळ सोडण्यात आला. परंतु दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने व नदीपात्र कोरडे असल्याने कंपनीच्या पाणीसाठ्यापर्यंत मुबलक पाणी पोहचू शकले नाही. याच नदीच्या मार्गात असलेल्या वाडा शहरासाठीचा सिद्धेश्वरी बंधारा पूर्णपणे भरल्याने कंपनीने नगरपंचायतीकडे पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला होता. परंतु वाडा शहरातील नागरिकांच्या प्रखर विरोधामुळे वाडा नगरपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासन कंपनीस सहकार्य करण्यास तयार नव्हते. गेले दोन ते तीन दिवस कंपनी प्रशासन व पदाधिकारी आणि नागरपंचायात प्रशासन यांच्यात अतिरिक्त पाणीसाठा सोडण्याच्या प्रश्नावर चर्चेचे गुºहाळ रंगले होते.>अखेर पेचप्रसंगावर तोडगा निघालाअखेर सोमवारी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे व कंपनी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, मुख्यधिकारी प्रबोधन मवाडे, पाणी समिती सभापती जागृती काळण, भाजपचे गटनेते मनिष देहेरकर, नगरसेवक संदीप पवार, शिवसेना गटनेते संदीप गणोरे तसेच बहुसंख्य नगरसेवक यांच्यात यशस्वी चर्चा होऊन वाडा शहरासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून देण्याचे कंपनी प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर या वादाला पूर्णविराम मिळाला.>कंपनी प्रशासनाकडून नगरपंचायतीकडे अतिरिक्त पाणी देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन कंपनीकडून नागरपंचायतीसाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने आज नगरपंचायतीकडून अतिरिक्त असलेले पाणी सोडण्यात आले.- प्रबोधन मवाडे,मुख्याधिकारी-नगरपंचायत वाडा