शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पाटील दाम्पत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:58 IST

पालघर : पालघर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदार यादीत राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक व गटनेते मकरंद पाटील ह्यांनी घोळ घालून सत्ताधाऱ्यांशी अर्थपूर्ण ...

पालघर : पालघर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदार यादीत राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक व गटनेते मकरंद पाटील ह्यांनी घोळ घालून सत्ताधाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध ठेवले आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका डॉ.श्वेता पाटील ह्या बैठकीला सतत गैरहजर राहत असल्याचा ठपका ठेऊन आज राष्ट्रवादीने ह्या दोघांची पक्षातून हकालपट्टी केली.

पालघर नागरपरिषदेवर सेनेची सत्ता असून सेनेचे १७ नगरसेवक, राष्ट्रवादी १०, काँग्रेस एक असे बलाबल होते. नगरसेवक मकरंद पाटील ह्यांना गटनेते पद आणि विरोधी पक्ष नेते पद पक्षाने बहाल केले होते.पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी सभेत आपल्या नगरसेवकांनी मांडलेले प्रश्न उचलून न धरता उलट सत्ताधाऱ्यांना मदत करणारी भूमिका बजावल्याचा ठपका जिल्हा सरचिटणीस अनिल गावड ह्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत ठेवला. त्यांनी सत्ताधाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप ही त्यांच्यावर करण्यात आला. पालघर नगरपरिषदेच्या मतदार यादीत घोळ करण्यात मकरंद पाटील ह्यांचा हात असल्याचे समोर आल्या नंतर ह्या प्रकरणी त्यांनी तहसीलदारांची माफी मागीतल्याचा गौप्यस्फोट गावड ह्यांनी पत्रकार परिषदेत केला. नगरसेविका डॉ.पाटील ह्या नगरपरिषदेच्या सभांना जास्तीत जास्त गैरहजर कशा राहतील ह्याची काळजी घेत असल्याने त्यांचीही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रभारी गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा ह्यांच्या आदेशाने राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टीची घोषणा ह्यावेळी करण्यात आली.जोडपे शिवसेनेत जाणारपाटील दाम्पत्य सध्या शिवसेनेच्या वाटेवर असून डॉ.श्वेता पाटील ह्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी ह्यासाठी मकरंद हे सेनेच्या वरिष्ठांशी संधान साधून आहेत. मात्र शिवसेनेत अनेक निष्ठावान, शिक्षित महिला पदाधिकारी असतांना त्यांना उमेदवारी देण्यास प्रचंड विरोध होत आहे. 

मी आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिलो तसेच पालघर नगरपरिषदेमधील गैरव्यवहाराबद्दल बैठकांमध्ये विषय मांडले.तर डॉ.श्वेता ह्या प्रसूती दरम्यान बैठकीस उपस्थित नव्हत्या. मतदार यादीतील घोळाशी माझा संबंध नाही. - मकरंद पाटील,