पूजा दामले - मुंबई
सायन रुग्णालयात दीड वर्षापूर्वी गर्भवतींसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेला ‘एम मित्र’ (मोबाइल मित्र) हा उपक्रम लवकरच मुंबईतील सर्व रुग्णालयांमध्ये राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तीन रुग्णालये आणि 6 स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ‘एम मित्र’मध्ये 2 हजार 3क्क् गर्भवतींची नोंद झाली आहे.
गर्भवतींनी कोणती काळजी घ्यावी, त्यांचा आहार कसा असावा, कितव्या महिन्यात कोणत्या तपासण्या कराव्यात, मूल जन्माला आल्यावर 1 वर्षाचे होईर्पयत त्याचे संगोपन कसे करावे, याची शास्त्रशुद्ध माहिती प्रत्येक गर्भवतीर्पयत पोहोचावी, या हेतूने ही सुविधा सुरू करण्यात आली होती. सायन रुग्णालयामध्ये आतार्पयत 3 हजार गर्भवतींची नावे ‘एम मित्र’मध्ये नोंदवण्यात आली आहेत. यूएसच्या ‘मोबाइल अलायन्स फॉर मॅटर्नल अॅक्शन’ने (मामा) दिलेल्या निधीतून ‘एम मित्र’चा विस्तार संपूर्ण मुंबईत करण्यात येणार आहे, असे ‘एम मित्र’च्या रिसर्च अॅण्ड स्ट्रॅटेजी कमिटीच्या प्रमुख प्रेरणा कुमार यांनी सांगितले.
धारावी येथील मिनी सायन रुग्णालय, मालाड मालवणी येथील सामान्य रुग्णालय आणि अंधेरीचे बीएसीएस या तीन रुग्णालयांत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाचा विस्तार करताना मुंबईतल्या रुग्णालयांशी चर्चा करून सर्व रुग्णालयांमधून गर्भवतींची नोंद केली जाणार आहे. याचबरोबरीने अंगणवाडय़ांमधून आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनेदेखील महिलांच्या नावांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे प्रेरणा यांनी सांगितले.
च्गर्भवतींनी कोणती काळजी घ्यावी, त्यांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांचा आहार कसा असवा, मूल जन्मल्यानंतर 1 वर्षाचे होईर्पयत त्याचे संगोपन कसे करावे, याची सर्व माहिती एका रेकॉर्डेड मेसेजमार्फत दिली जाते.
च्बाळ जन्माला आल्यावर पहिल्या आठवडय़ात रोज एक मेसेज पाठवला जातो. एका आठवडय़ानंतर तीन महिन्यांर्पयत आठवडय़ातून दोनदा मेसेज पाठवला जातो. तर तीन महिन्यांनंतर एक वर्षार्पयत आठवडय़ातून एक मेसेज पाठवला जातो.
च्गर्भवती तपासणीसाठी रुग्णालयात गेल्यावर ‘एम मित्र’तर्फे तिची सर्व माहिती घेतली जाते. तिचा मोबाइल क्रमांक घेतला जातो. तिला कितवा महिना सुरू आहे, हे विचारले जात़े तिला कोणत्या वेळेत आणि कोणत्या भाषेत हा रेकॉर्डेड मेसेज पाठवायचा, याची माहिती घेतली जाते. यानंतर त्या महिलेला आठवडय़ाला दोन वेळा हा मेसेज पाठवण्यात येतो.