शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही जसे घडलो, तसे तुम्हीही घडा’ माजी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:37 IST

शाळेच्या माजी विद्यार्थ्याचा एक ग्रुप २७ वर्षे उलटून गेल्यावरही गुरु - शिष्य परंपरा जोपासत आपल्याला घडविणा-या शिक्षकांना निमंत्रीत करून ऋणानुबंध सोहळा

वाडा : शाळेच्या माजी विद्यार्थ्याचा एक ग्रुप २७ वर्षे उलटून गेल्यावरही गुरु - शिष्य परंपरा जोपासत आपल्याला घडविणा-या शिक्षकांना निमंत्रीत करून ऋणानुबंध सोहळा आयोजित करतात आणि शाळेतील मुलांना संगणक भेट देऊन ‘आम्ही इथे जसे घडलो, तसे तुम्हीही घडा’ हा प्रेरणादायी संदेश देऊन चांगला आदर्श निर्माण करतात. हे कौतुकास्पद असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनी दिली.तालुक्यातील कुडूस विभाग शिक्षण सेवा संघ या संस्थेच्या ह. वि. पाटील विद्यालयाच्या १९९०-९१ च्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचचा ‘बंध मैत्रीचे’ नावाचा मित्र-मैत्रीणींचा एक ग्रुप विविध क्षेत्रात चांगला नावलौकिक मिळवून आहेत. यावर्षी त्यांनी शाळेतील मुलांसाठी चार संगणक भेट देण्याच्या निमित्ताने कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी संस्थाध्यक्ष श्रीकांत भोईर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थापैकी सुजाता साळुंखे, रत्नप्रभा चौधरी, डॉ. पुनम बागुल, जगदीश भोईर, सुधीर कडव यांनी आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांकडून मिळालेले शिस्तीचे, संस्काराचे धडे घेऊन आम्ही कसे घडलो हे त्यांनी सांगितले. तर त्यांचे शिक्षक आणि सध्या पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच ेउपशिक्षणाधिकारी असलेले जे. के. पाटील, बी. एस. भोईर यांनी शालेय जीवनातील शिस्त जिद्द आणि संघर्षाचे महत्व विषद केले. कार्यक्र मास माजी शिक्षक पी. एन. पाटील, सावंत सर, पाचपांडे, व्ही. पी. भोईर, व्ही. सी. भोईर , चौधरी सर या सर्व निमंत्रितांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थाचे पालक परशुराम भोईर व सिताराम भोईर यावेळी उपस्थीत होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक पोटकुले सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर कडव, अनंता दुबेले,संदीप पाटील, सतिश मराडे, समीर शेख आदींनी परिश्रम घेतले.