शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पालघरात ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:28 IST

लोकसभेच्या २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीत वापरल्या जाणाºया ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या यंत्रांचे प्रात्यक्षिक सातपाटीच्या मच्छीमार्केट मध्ये जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे ह्यांच्या उपस्थितीत पार पडले.

पालघर : लोकसभेच्या २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीत वापरल्या जाणाºया ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या यंत्रांचे प्रात्यक्षिक सातपाटीच्या मच्छीमार्केट मध्ये जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे ह्यांच्या उपस्थितीत पार पडले. महिलांनी त्यात सहभाग घेतला.आगामी निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) सोबत व्होटर व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हिव्हीपॅट) यंत्राचा वापर प्रथमच करण्यात येणार आहे. या व्हिव्हीपॅटमुळे मतदारांना त्यांनी कोणत्या उमेदवाराला मत दिले याबाबतची खात्री करून घेता येणार आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबत पालघर जिल्ह्यातील सर्व मतदारांना माहिती होण्यासाठी या यंत्राची प्रात्यक्षिके दाखविण्याचा कार्यक्रम २७ डिसेंबर पासून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये आयोजिण्यात आला आहे.या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीमध्ये सातपाटी मच्छीमार्केट येथे करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पालघर डॉ. किरण महाजन, मतदार नोंदणी अधिकारी, पालघर विधानसभा मतदार संघ विनोद खिरोळकर, व तहसिलदार पालघर महेश सागर हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मतदारांना ह्या यंत्रा बाबत माहिती देण्यात आली व त्यामध्ये मतदारांनी त्यांची मते नोंदविली. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदारांनी या बाबतची माहिती प्राप्त करु न घ्यावी, असे आवाहन डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

टॅग्स :palgharपालघर