शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आलोंड्यातील एस्टीम कंपनी बंद, अनेक बेरोजगार

By admin | Updated: September 25, 2016 04:00 IST

विक्र मगड तालुक्यातील एकमेव अशा एस्टीम इंडस्ट्रीयल कंपनीला तिने सार्वजनिक ठिकाणी प्रदूषण निर्माण केल्यामुळे तिचे कामकाज बंद करण्याच आदेश वाडा उपविभागीय

- राहुल वाडेकर, विक्रमगड

विक्र मगड तालुक्यातील एकमेव अशा एस्टीम इंडस्ट्रीयल कंपनीला तिने सार्वजनिक ठिकाणी प्रदूषण निर्माण केल्यामुळे तिचे कामकाज बंद करण्याच आदेश वाडा उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नंदलकर यांनी दिला आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार होणार आहेत. कंपनीने सोडलेल्या केमिकलयुक्त पाण्यामुळे आलोंडे या गावातील शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच या केमिकलयुक्त पाण्यामुळे गावातून वाहणाऱ्या ओहळातील पाणी फेसाळ बनल्यामुळे मासे, खेकडे मोठ्या प्रमाणात मृत पावले होते. हे पाणी प्यायल्याने येथील एका शेतकऱ्याच्या दोन गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. या केमिकल मिश्रीत पाण्यामुळे आलोंडे परिसरातील अनेक शेतक-यांच्या भातशेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. आलोंडे गावालगत एका नाल्याशेजारी गेल्या दोन वर्षापासून ही केमिकल कंपनी सुरु आहे. तिचे दूषित पाणी शेजारच्याच नाल्यामध्ये सोडले आहे. सध्या हा नाला वहात असून या नाल्याशेजारील भातशेती करपू लागली आहे. अशी तक्रार उपसरपंच प्रमोद पाटील यांनी दोन महिन्यापूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे. परंतु त्यांनी आजवर दखल घेतली नव्हती असे सांगितले. दरम्यान वाड्याचे उपविभागीय महसुल अधिकारी डॉ. मोहन नलदकर यांनी या कंपनीला भेट देवून कंपनी तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र याशासकीय आदेशामुळे शेकडो स्थानिक तरुणांपुढे बेरोजगारीचे संकट उभे राहिले असून पुन्हा एकदा त्यांच्या उदरिनर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.कंपनीच्या व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता हे कृत्य एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांने जाणून-बुजून केले असून याबबत आम्ही विक्र मगड पोलिस स्टे. येथे गुन्हा नोंदविला आहे. तसेच झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास कंपनी प्रशासन तयार आहे. मात्र पुढील शासकीय आदेश येईपर्यंत आम्ही कंपनीचे उत्पादन थांबवत आहोत, असे म्हटले आहे. मुळात कंपनीने वेळीच जागरुकता दाखवून संबंधितांना भरपाई दिली असती व प्रदूषण थांबविले असते तर ही कारवाई करावीच लागली नसती. आता गळ्यापर्यंत आल्यावर कंपनीला भरपाईची भाषा सुचते आहे, अशी टीका ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना केली.ही कंपनी बंद झाल्यास येथील स्थानिक आदिवासी तसेच इतर समाज्याच्या तरु णांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळून अनेक संसार रस्त्यावर येतील.त्यासाठी कंपनी बंद करणे हा पर्याय नसून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देऊन ही कंपनी चालू ठेवावी. कंपनीने आपली सुरक्षा व्यवस्था वाढवून असे ेप्रकार पुढील काळात घडणार नाही, याची काळजी घ्यावी.- डॉ.सिद्धार्थ सांबरे, सामाजिक कार्यकर्ते.मी विक्र मगड तालुक्यातील बोरसे पाडा येथील तरु ण असून आलोंडा येथील कंपनी चालू झाल्याने मला येथे रोजगार मिळाला.गेली चार वर्ष मी या कंपनीत काम करतो व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. ही कंपनी प्रशासनाने बंद केल्यास मी माझ्या सारख्या अनेक आदिवासी तरु णांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल.- बाळू सहारे, आदिवासी स्थानिक कामगार.शासनाने तडकाफडकी निर्णय घेऊन आलोंडा येथील एस्टीम प्रा.ली. कंपनीला सील ठोकले आहे त्यामुळे आमच्यापुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने योग्य तो निर्णय घेऊन ही कंपनी त्वरित चालू करावी. नाही तर येथील बेरोजगार झलेल्या तरु णांना पर्यायी नोकऱ्या द्याव्यात नाही तर या कंपनीतील शेकडो बेरोजगार तरु णांना आंदोलन करावे लागेल.- सतेज ठाकरे, स्थानिक कर्मचारी.