शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मतदान व मतमोजणीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 01:04 IST

जिल्हा परिषदेच्या ५७ आणि आठ पंचायत समित्यांमधील ११२ जागांसाठी मंगळवारी ७ जानेवारी रोजी मतदान होणार

हितेन नाईकपालघर : जिल्हा परिषदेच्या ५७ आणि आठ पंचायत समित्यांमधील ११२ जागांसाठी मंगळवारी ७ जानेवारी रोजी मतदान होणार असून मतदान व मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने ७ डिसेंबर २०१९ रोजी पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर केलेला होता. त्यानुसार ७ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान जिल्ह्यातील एकूण १ हजार ३१२ मतदान केंद्रावर मतदान होणार असून बुधवारी ८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीच्या तयारीचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा घेतला असून निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्व मतदारांची एकूण संख्या १० लाख ४४ हजार १८८ इतकी असून त्यात ५ लाख ३० हजार ६२१ पुरुष तर ५ लाख १४ हजार २२८ महिला आणि ३४ इतर अशी संख्या आहे. मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी व इतर कर्मचारी असे एकूण ७ हजार २२१ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून २६ डिसेंबर २०१९ पासून निवडणूक परिषद प्रशिक्षणाच्या कार्यक्रम ही पार पडला आहे. मतदानासाठी एकूण २ हजार २८४ बॅलेट युनिट तर १ हजार ८५३ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगितले.या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम यंत्राचा वापर होणार असून त्यासोबत व्हीव्हीपॅट यंत्र नसेल. एसीआई एलकंपनीचे यंत्र असून ते अत्याधुनिक असल्याच्या दावा प्रशासनाने केला असून १ हजार ३१२ मतदान केंद्रात साठी १ हजार ८५० ईव्हीएम यंत्र वितरीत करण्यात येणार आहेत.>६ आणि ७ जानेवारी रोजी शाळा व महाविद्यालयाला सुटी जाहीर : जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाºया आठ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी दि. ६ जानेवारी तसेच मतदानदि. ७ जानेवारी रोजी पालघर जिल्ह्यातील शाळा, विद्यालय तसेच महाविद्यालयाला सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.>जिल्ह्यातील तालुकानिहाय मतमोजणी केंद्रतलासरी तालुक्यातील मतमोजणी तलासरी तहसील कार्यालयात होणार असून डहाणू तालुक्यातील मतमोजणी सेंट मेरी हायस्कूल मसूरी येथे, विक्रमगड तालुक्यातील मतमोजणी विक्रमगड पंचायत समिती सभागृह जवळील आदिवासी भवन येथे, मोखाडा तालुक्यातील मतमोजणी क्रांतीवीर राघोजी भांगरे सभागृह पंचायत समिती मोखाडा येथे, वाडा तालुक्याची मतमोजणी पीजी हायस्कूल वाडा येथे, पालघर तालुक्याची मतमोजणी टीमा बोईसर हॉलमध्ये तर वसई तालुक्यातील मतमोजणी वसई तहसील कार्यालय सभागृहात होणार आहे.