शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण समिती परिवहनला दाखवणार ‘आरसा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:24 IST

परिवहनच्या बसखाली येऊन अनेकांचा मृत्यू; महापालिका मुख्यालयासमोर वाहणार श्रद्धाजंली

वसई : पर्यावरण संवर्धन समितीतर्फे महानगरपालिका परिवहन बसखाली सापडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींना पालिका मुख्यालयासमोर श्रद्धांजलि वाहण्यात येणार आहे. या मृत व्यक्तींना सर्वस्वी परिवहनचा खाजगी ठेकेदार जवाबदार असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीतर्फे करण्यात येत आहे.२६ फेब्रूवारी रोजी भुईगांव येथील कमल गोविंद जोशी (६०) या महिलेचा बसखाली चिरडून मृत्यू झाला होता. वसई विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालविली जाते. या कंपनीच्या ठेकेदाराने नेमलेले चालक बेदरकारपणे अतिवेगात शहरात बस चालवित असल्याच्या तक्र ारी येत आहेत. अनेकदा हे चालक वाहतूक व रहदारीचे नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे. मध्यंतरी महिला प्रवाशांशी उद्धत वर्तन करत असल्याचा चालकाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झाला होता. या कंपनीच्या अनेक बसेस मंजूर स्वरूपाच्या असून कार्बन मोनाक्साईडसारखा घातक धरू वातावरणात सोडत असल्यामूळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समिर वर्तक यांनी केला आहे.इतर महानगरपालिका क्षेत्रातील अपघातांच्या प्रमाणापेक्षा आपल्या येथे ते प्रमाण कमी आहे. १८ लाख विम्यातून अपघातग्रस्तांना मदत केली असून, काही ठिकाणी विम्याची रक्कम येणे बाकी आहे. बसेस चांगल्या स्थीतीत आहेत.- मनोहर सकपाळ, ठेकेदार, मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट कंपनीभुईगांव येथील मृत महिलेच्या वारसांना मदत म्हणून स्थानिक नगरसेवक यांनी ५० हजार व परिवहन कडून १५ हजार अशी एकूण ६५ हजार मदत करण्यात आली आहे. चालकांनी कामावर असताना मोबाईल जवळ ठेऊ नये म्हणून स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत.- प्रितेश पाटील, परिवहन सभापती

टॅग्स :Vasai Virarवसई विरार