शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गाव-खेड्यापाड्यात माहेरवाशीण गौरींचे उत्साहात स्वागत; गं पोरी गवरी आली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 00:42 IST

गणपतीची आई, शिवाची पत्नी आणि दक्ष राजाची कन्या गौरी घरोघरी झाली विराजमान

विक्रमगड : गणपतीची आई, शिवाची पत्नी आणि दक्ष राजाची कन्या असलेली गौरी आज घरोघरी विराजमान झाली. माहेरवाशिणीचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या गौरीची मंगळवारी महिलांनी मुहूर्तावर नटून-थटून पूजा केलीच, पण आजच्या गौरीनाही साजशृंगार तितक्याच उत्साहात केला. दरम्यान, तालुक्यात शहर, गाव-खेड्यापाड्यासह माहेरवाशीण गौरींचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

विक्रमगड शहरात मंगळवारी गौरी गणपती बाप्पासोबत विराजमान झाल्या आहेत. परंपरेनुसार आणि नवसाच्या म्हणून तांब्यांच्या गौरीची सर्वसाधारण: ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौरींची प्रतिष्ठापना घरांमध्ये केली जाते. पारंपरिक पद्धतीने फुलांच्या खंड्यांच्या गौरी बसविल्या जातात. गौरीच्या आकर्षक सोज्वळ, साजिºया छबी आणि मुखवटे भाविकांनी भक्तिभावाने घरी आणले व पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. घरात समृद्धीच्या पावलांनी ये, अशी प्रार्थना महिलांनी गौरीकडे केली. गुरुवारी २७ आॅगस्टला गणपती बाप्पांसोबत गौरीलाही निरोप दिला जाणार आहे. पण हे तीन दिवस गौरीच्या कौतुकात सगळेच रमणार आहेत.

गौरीला नैवेद्यासाठी शेपूच्या भाजीसह १६ शाकाहारी भाज्या करण्याची प्रथा आहे, तर गौरीच्या पूजेला पुरणपोळीचा नैवैद्य असतो. काही घरात परंपरेनुसार श्रावण मासांतील शाकाहारी व्रताची सांगता यामुळे होते. विक्रमगडमधील महिला परंपरेनुसार दरवर्षी गौरीचे उत्साहात स्वागत करतात.थेट स्वयंपाकघरात अवतरते गौराईवाडा : कोरोनाच्या सावटावर मात करीत मंगळवारी भक्तिभावाने घरोघरी गौराईचे आगमन झाले. वाडा तालुक्यात विशेष परंपरा म्हणजे थेट स्वयंपाकघरात चुलीजवळ या गौराई मातेसाठी आरास मांडली जाते. पाटावर शोभिवंत चादर अंधरून त्यावर तांदळाची रास ठेवून लक्ष्मीच्या रूपाने घरात प्रवेश केलेल्या गौराईचे स्वागत गावखेड्याच्या ग्रामीण भागात झाले.

वाडा, कुडूस या शहरी भागात माती, साडू किंवा प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गौराईमाता बसविण्यात आल्या, तर काही ठिकाणी मुखवटे तयार करून त्याचे पूजन करण्यात आले. शेतकऱ्यांनी मात्र पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याला पसंती दिली. गौरीमाता म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीण अशी श्रद्धा ग्रामीण भागात आहे.

जंगलातील विविध वेली, गौराईच्या नावे असणारे इंदूचे, सीडीचे फूल, गाय गोमेटेची वेल, दिंडीच्या पानात हिरवी गौराई माता तयार केली जाते. या हिरव्या गौराईला मंगळसूत्र, बांगड्या, नथ आदी आभूषणे घातली जातात. घरात तांबड्या मातीचे पट्टे ओढून त्यावर तांदळाच्या पिठाने गौराईची पावले उमटवली जातात. माहेरी आलेली गौराईमाता संपूर्ण घरात आनंदाने भरल्या मनाने व प्रेमाने वास्तव्य करते. गौराई मातेसाठी अळू, भेंडी, माटाची भाजी यांचा नैवेद्य दाखविला जातो. खेड्यापाड्यात अळूचे पान, तांदळाचे पीठ, दही यापासून पातवड नावाचा पदार्थ बनवला जातो. अतिशय रुचकर असणारा हा पदार्थ वर्षातून एकदाच गौराई मातेसाठी बनवला जातो.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव