शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुकणे पाणीयोजनेचे ‘इंजिन’ रुळावर

By admin | Updated: October 17, 2015 23:29 IST

वाढीव खर्चास मान्यता : महासभेत सात तास चर्चा, सेना-भाजपचा लटका विरोध; अन्य पक्षांची संमती

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून निविदाप्रक्रियेतील अनियमितता आणि वाढीव खर्चाच्या मुद्यावरून फलाटाच्या बाजूला पडलेले मुकणे पाणीयोजनेचे ‘इंजिन’ अखेर सेना-भाजपाचा लटका विरोध वगळता सर्वपक्षीय संमतीने शनिवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत रुळावर आणण्यात सत्ताधारी मनसेला यश आले. सदस्यांनी सदर योजनेसाठी लागणाऱ्या वाढीव ३६ कोटी रुपयांच्या खर्चाला आक्षेप घेतला, परंतु जवाहरलाल नेहरू नागरी अभियानातील मार्गदर्शक सूचनेनुसार महापालिकेला वाढीव खर्च करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर योजनेचा मार्ग मोकळा झाला. सात तास चाललेल्या महासभेत सुमारे ४४ सदस्यांनी मुकणेप्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करत पाणीपुरवठा वितरणातील दोषांवरही बोट ठेवले. मुकणे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविण्याचा प्रस्ताव महासभेवर आयुक्तांकडून ठेवण्यात आला होता. सर्वपक्षीय सदस्यांनी भविष्यातील नाशिकची पाण्याची गरज भागविण्यासाठी मुकणे पाणीयोजना अत्यावश्यकच असल्याचे सांगत योजनेला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट केले, परंतु सदर योजनेच्या निविदाप्रक्रियेतील अनियमितता आणि त्यासाठी लागणारा ३६ कोटी रुपयांचा वाढीव निधी कुणी खर्च करायचा, आदि मुद्दे उपस्थित केले. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना सदर खर्च मनपाला करणे शक्य नाही. त्यामुळे वाढीव खर्चाचा निधी शासनाकडून मिळावा. सीव्हीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निविदाप्रक्रिया राबविलेली नाही. निविदा समितीने तांत्रिक बदलांची तपासणी केली आहे काय? सदर निविदाप्रक्रियेला दिलेली स्थगिती ही राजकीय होती काय आदि प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आले. शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते व सुधाकर बडगुजर यांनी सदर योजना ही युतीच्याच काळात मंजूर झाल्याचे सांगत योजनेला विरोध नसल्याचे स्पष्ट केले, परंतु शासनाच्या पत्रानुसार प्रशासनाने कार्यवाही केली आहे काय, असा प्रश्नही उपस्थित केला. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी वेगवेगळे अंदाज देणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले. अखेर महापौर अशोक मुर्तडक यांनी प्रस्तावाला मान्यता दिली.