शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

विक्रमगडमध्ये निवडणुकांची रणधुमाळी

By admin | Updated: April 9, 2016 02:05 IST

विक्रमगड तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रमुख पक्षांमध्ये भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकपा, परुळेकर मंच, मनसे, बविआ, शिवसेना व अपक्ष आदी

तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रमुख पक्षांमध्ये भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकपा, परुळेकर मंच, मनसे, बविआ, शिवसेना व अपक्ष आदी मिळून ७२३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत़ येत्या १७ एप्रिलला निवडणूक होत असल्याने आता उमेदवारांना प्रचारासाठी अवघा एक आठवडाच मिळणार आहे़ त्यामुळे कार्यकर्ते कामाला लागले असून उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे़ त्यासाठी उमेदवार आपल्या पॅनलसह मतदारांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करताना दिसत आहेत़ या निवडणुका विक्रमगड तहसीलदार कार्यक्षेत्रातील तलवाडा, विक्रमगड या मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये होत आहेत़ तालुक्याच्या राजकारणातील प्रमुख पक्षांमध्ये भाजपा-शिवसेना, माकपा, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडी हे मोठे आहेत. पक्षीय ताकद कितीही असली तरी यापूर्वी निवडून दिलेल्या उमेदवारांनी ग्रामपंचायतीमार्फत गावामध्ये किती विकासकामे केली आहेत, यावरही सारे काही अवलंबून राहणार आहे़ तालुक्यातील केगवा-बालापूर ग्रामपंचायतीमधील एकूण १३ जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील ६ जागा या केगव्यामध्ये येत असल्याने वॉर्ड क्र-१ अ मधून अ.ज. महिला पिंकी मगन मालकरी व ज्योती यशवंत भावर, तर वॉर्ड क्ऱ २ ब मधून अ.ज. महिला अस्मिता नवशा लहांगे बिनविरोध निवडून आल्या आहेत.>वसईमध्ये ११ ग्रामपंचायतींसाठी २६८ उमेदवार रिंगणातवसई : तालुक्यातील एकूण ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १४४ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २६८ उमेदवार मैदानात उतरले आहेत. चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. येत्या १७ एप्रिलला मतदान होणार असून आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.वसई तालुक्यातील पोमण, चंद्रपाडा, खानिवडे, शिवणसई, उसगाव, शिरवली, मेढे-वडघर, आडणे-भिनार, माजिवली-दापिवली, सकवार आणि कळंभोर या ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या १७ एप्रिलला होणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १४४ उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर, ४ जागांवर बिनविरोध निवड झाली. आता २६८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये बहुजन विकास आघाडीविरुद्ध शिवसेना-भाजपा यांच्यात सामना होणार आहे. तर, काही ग्रामपंचायतींमध्ये श्रमजीवी संघटना ताकदीनिशी उतरली आहे.