शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पालघरात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी टिपेला

By admin | Updated: February 8, 2016 02:25 IST

पालघर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या प्रचारासाठी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सेनेच्या प्रचारासाठी पालघरमध्ये सभा घेणार आहेत

पालघर : पालघर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या प्रचारासाठी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सेनेच्या प्रचारासाठी पालघरमध्ये सभा घेणार आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात पालघरमधील राजकीय वातावरण भलतेच तापणार असल्याचे चिन्हे आहेत.केंद्रात व राज्यात भाजपा-सेनेने सत्ताग्रहण केल्यानंतर वर्षभराच्या कालावधीमध्ये महागाईने मोठी उसळी घेतली व सर्वसामान्यांचे जीवनमान ढासळले. अच्छे दिनचे आमिष दाखवून निवडून आलेल्या या सरकारने मतदारांचा भ्रमनिरास केल्याने बिहारसह राज्यातील महानगरपालिका, स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपा-सेनेच्या उमेदवारांना धूळ चारून काँगेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जिंकून दिले. त्यामुळे राजकीय बदलाचा सत्ताधाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. संपूर्ण राज्याचे पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लक्ष लागून राहील्याने वाढवण बदंर उभाारणीबाबत भाजपा-सेनेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला रोष थोपविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीसांना पालघरमध्ये पाचारण करण्यात आलेले आहे. पालघरमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणुक मिळत नसल्याने व राज्यातही भाजपा व सेनेच्या मंत्र्यांमध्ये तू तू - मै मै होत असल्याने ताणल्या गेलेल्या या संबंधामध्ये सामंजस्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी बजावावी, असा मानस सेनेचे पदाधिकारी बाळगून आहेत. सेना-भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पालघर-डहाणू तालुक्यातील किनारपट्टीवरच वाढवण बंदर उभारण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी करून एप्रिल महिन्यात निविदाही काढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड संताप आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व बविआने आमचा वाढवण बंदराला विरोध आहे, असे सांगून आपण नागरीकांसोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री वाढवण बंदराबाबत काय घोषणा करतात याकडे लक्ष लागले आहे. पोलीस उपअधिक्षक यशोद, उपविभागीय पोलीस अधिकारी बजबळे आदींनी सुरक्षेची पाहणी केली.