शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:53 IST

जि.प. चे तीन गट, पंचायत समितीचे दोन गण

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ गटांपैकी ३ गट बिनविरोध झाल्याने उर्वरित ५४ गटांसाठी २२० उमेदवार रिंगणात आहेत, तर ११४ पंचायत समितीपैकी २ गणाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने ११२ गणांसाठी एकूण ४३१ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील महाआघाडी स्थापन करून सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआ या राजकीय पक्षांचे गणित जिल्ह्यात बिघडल्याने सर्व पक्षांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाने २३ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या ५६ गणांसाठी उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेने ४६ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या ९४ गणांसाठी उमेदवार उभे केले आहेत. भाजप ४५ जिल्हा परिषद गट तर ९४ पंचायत समिती गणांसाठी लढत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १६ जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार उभे केले असून पंचायत समिती गणासाठी ३८ उमेदवार उभे आहेत. काँग्रेस पक्षाचे १० उमेदवार जिल्हा परिषद गटासाठी, तर १३ उमेदवार पंचायत समिती गणासाठी उभे आहेत. बहुजन विकास आघाडीकडून जिल्हा परिषद गटाकडून १५ उमेदवार रिंगणात असून ३६ उमेदवार पंचायत समिती गणासाठी रिंगणात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्हा परिषद गटासाठी ९ उमेदवार तर पंचायत समितीसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जि.प. गटासाठी १ तर पंचायत समिती गणासाठी शून्य, बहुजन मुक्ती मोर्चाकडून १ पंचायत समिती गणासाठी उमेदवार उभा असून जिल्हा परिषदेच्या गटासाठी ३७ अपक्ष उभे असून ७८ अपक्ष रिंगणात आहेत.तलासरी तालुक्यात माकपचे आमदार विनोद निकोले हे निवडून आल्याने माकपची राजकीय शक्ती वाढली आहे. त्यांना बविआची साथ मिळणार असल्याने विरोधात लढणाºया भाजप-सेनेला ही लढाई जिकिरीची बनणार आहे.एकमेकांना अडचणीचे ठरताहेत विविध उमेदवारवसईत जि.प.च्या ३ जागांसाठी १० व पंचायत समितीच्या ७ जागांसाठी २२ उमेदवार उभे आहेत. येथे जि. प.च्या एका गटात बविआविरुद्ध सेना, भाजप व काँग्रेस तर दुसºया एका गटात सेना विरुद्ध भाजप तर तिसºया गटात बविआ विरुद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे.वाडा तालुक्यात राष्ट्रवादी, माकप, बविआ, काँग्रेस अशी आघाडी असल्याचे निदर्शनास येत असले तरी जि.प.च्या एका जागेवर राष्ट्रवादी, बविआ, एका जागेवर राष्ट्रवादी-माकपचे उमेदवार एकमेकांना अडचणीचे ठरत आहेत. पंचायत समितीच्या लढतीतही असेच चित्र आहे.