शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सेवा हक्क कायदा प्रभावीपणे राबवा, स्वाधीन क्षत्रिय यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:35 IST

राज्य शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम हा क्रांतिकारी कायदा जनहितासाठी आणि लोकांना अधिकार देण्यासाठी केला आहे.

- अरिफ पटेलमनोर : राज्य शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम हा क्रांतिकारी कायदा जनहितासाठी आणि लोकांना अधिकार देण्यासाठी केला आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी विहीत वेळेत नागरिकांना सुविधा उपलब्ध करू न देण्याबरोबरच या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी केले आहे.पालघर जिल्ह्यातील मनोर येथे संपूर्ण सेवा अभियानांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम २०१५ अंतर्गत विविध सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, शासनाच्या सेवा विहीत कालावधीत व पारदर्शकपणे मिळाव्यात या उद्देशाने हा कायदा करण्यात आला आहे. सेवा हमी कायद्यानुसार ज्या कल्पना निश्चित केल्या होत्या त्या कल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी पालघर जिल्ह्यामध्ये सुरु आहे ही बाब कौतुकास्पद आहे. तसेच, कातकरी समाजापासून सुरु केलेल्या संपूर्ण सेवा अभियानाची अंमलबजावणी ही अभिनंदनीय बाब असल्याचे सांगून त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. आदिवासी बहुल जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्या बाबत समाधान व्यक्त करीत जिल्हा परिषदेने गावोगावी हा कायदा पोहोचिवण्याच्यादृष्टीने नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले.व्यासपिठावर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, लोकसेवा हक्क आयोगाचे उपसचिव संजय काटकर, उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील, पंचायत समिती सदस्य श्रध्दा घरत, पालघरचे प्रांताधिकारी विकास गजरे, तहसीलदार महेश सागर आदी उपस्थित होते.>सेवा शिबिरात विविध सेवांचे वाटपया सेवा शिबिरात विविध सेवांचे वाटप क्षत्रिय यांच्याहस्ते करण्यात आले. यामध्ये महसूल विभागाच्या कातकरी जमातीच्या लाभार्थ्यांना जातीचे दाखले, राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य लाभार्थ्यांना धनादेश वाटप, शिधा पत्रिकां, कृषी विभागाच्या आत्मा नोंदणी प्रमाणपत्र, मागेल त्याला शेततळे, कार्यारंभ आदेश आदींचे वाटप करण्यात आले.पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागांच्या लाभार्थ्यांना व समाज कल्याण विभागाच्या लाभार्थ्यांना लाभ मंजूर झाल्याबाबतचे मंजूरी पत्र देण्यात आले. नंतच्या सत्रात त्यांनी मनोर ग्रामपंचायतीस भेट देवून सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीची पाहणी केली.क्षत्रिय यांनी नागरिकांना आॅनलाईन अर्ज करण्यासाठी प्रवृत्त करावे अशा सूचना केल्या. आपले सरकार केंद्रात नागरिकांना सर्व प्रकाराच्या सेवांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करु न द्यावेत. तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक केले. कार्यक्र माचे प्रास्तविक प्रांत विकास गजरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन तहसिलदार महेश सागर यांनी केले.>सर्व प्रकारच्या सेवा दीड वर्षात गावोगावीजिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी, जिल्ह्यामध्ये संपूर्ण सेवा अभियानांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच कातकरी उत्थान अभियानांतर्गत केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच सर्व प्रकारच्या सेवा आगामी दीड वर्षात गावागावांपर्यंत पोहोचिवण्यासाठी नियोजन केले असल्याचे सांगितले. तर जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी जिल्हा परिषद यंत्रणा लोकसेवक म्हणून सर्वसेवा विहीत कालमर्यादेत देण्यास कटीबध्द असल्याचे सांगितले.