शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा योजनेला बॅँकांचेच ‘ग्रहण’, एन.पी.एचे कारण पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:23 IST

राष्ट्रीयकृत बँकांच्या असहकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी असा गाजावाजा करण्यात आलेली मुद्रा कर्ज योजना फोल ठरत असून बँकांकडे कर्ज मागण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील बेरोजगार तरु णांना बँकेतून कर्ज दिले जात नसल्याने त्यांना निराश होऊन परतावे लागत आहे.

-हितेन नाईक, निखिल मेस्त्री पालघर : जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या असहकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी असा गाजावाजा करण्यात आलेली मुद्रा कर्ज योजना फोल ठरत असून बँकांकडे कर्ज मागण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील बेरोजगार तरु णांना बँकेतून कर्ज दिले जात नसल्याने त्यांना निराश होऊन परतावे लागत आहे.या योजनेअंतर्गतचा लाभ घेण्यासाठी बँकांकडे संबंधित पुरेसे कागदपत्रे घेऊन गेलेल्या बेरोजगार तरु णांना बँका कर्ज देत नसल्यामुळे त्यांची घोर निराशा होत असून एकही लोकप्रतिनिधी ह्याबाबत बँकांना जाब विचारत नसल्याने तरु णांना नाउमेद होत आहे. ३१ डिसेंबर २०१७ अखेरीस जिल्ह्यात ६ हजार २४२ लाभार्थीना केवळ ५२.०१ कोटी इतकेच कर्ज वाटप केलेले आहे. आश्चर्याची बाब अशी की या कर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयकृत बँकांपैकी १९ बँकानीच अशाप्रकारे कर्ज उपलब्ध करून देण्यात रस दाखिवलेला आहे. त्यातही जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणजे बँक आॅफ महाराष्ट्रचा सर्वात मोठा वाटा आहे. या बँकेने सर्वाधिक म्हणजे १४ कोटी ४७ लाख इतके मुद्रा कर्ज वाटप केलेले आहे. तर खाजगी बँका-वित्तीय संस्था चे सर्वाधिक लाभार्थी (३०१५) तर त्याखालोखाल देना बँकचे लाभार्थी (१०८४) एवढे असले तरी या बँकांनी केलेले कर्जवाटप अनुक्र मे १०.२० कोटी व ४.६४ कोटी एवढेच आहे.मुद्रा योजनेअंतर्गत लाभार्थ्यास शिशु-किशोर-तरु ण अशा तीन गटातून नवीन व्यवसायासाठी व व्यवसाय वृद्धीसाठी ५० हजारापासून ते १० लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. कोणत्याही हमी शिवाय हे कर्ज सहजरित्या उपलब्ध करून दिली जाणारी योजना अशी मोठं मोठे जाहिरातिचे बॅनर लावून शासन पातळी वरून गाजावाजा केला जात आहे. मात्र, येथील बँका ती राबविण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत गेलेल्या लाभार्थ्यांना तारण हवे, वेगवेगळी कागदपत्रे हवीत, हमी देणारे हवेत आदी कारणे सांगून धुडकावून लावत आहेत.अशा प्रकारची कर्ज देऊन आमची शाखा एन.पी. ए. (नॉन परफॉर्मींग एसेट्स) झाली असल्याची कारणेही बँका देताना दिसत आहेत. गेल्यावेळीही कोकण विभागात या योजनेअंतर्गतची पालघर जिल्ह्याची एकंदरीत कामिगरी खूपच निराशाजनक असल्याचे कोकण माहिती व जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या एका माहितीपत्रकातून स्पष्ट होत आहे.