शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

ढोळकी विहीर डागडुजीच्या प्रतीक्षेत, जलस्रोत बंद होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:23 IST

विहिरीतील दुर्गंधी आणि शेवाळेयुक्त पाणी पिण्यास योग्य न राहिल्याने ढाढरे, डोंगरवाडी,उंबरवाडीतील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे.

- रवींद्र सोनावळे शेणवा : निकृष्ट बांधकाम, तुटलेले कठडे, सभोवती झाडे - झुडुपे, साचलेला गाळ त्यातच झाडांचा पालापाचोळा पडून जलस्रोत बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या विहिरीतील दुर्गंधी आणि शेवाळेयुक्त पाणी पिण्यास योग्य न राहिल्याने ढाढरे, डोंगरवाडी,उंबरवाडीतील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. तर ढाढरे ओहोळालगत असणारी ढोळकी विहीर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अजूनही डागडूजीच्या प्रतीक्षेत आहे.शहापूर तालुक्यात सर्वत्र पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असताना पाण्याच्या स्रोतांचे जतन आणि संवर्धन करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसते. ढाढरे गावानजीकच्या ओहोळालगतच्या अवघ्या दहा फूट खोल असणाऱ्या तसेच पाण्याचे स्रोत असून मुबलक पाणी असणाºया विहिरीकडे केलल्या दुर्लक्षामुळे येथील पाणीच पिण्यायोग्य राहिलेले नाही. विहिरीचे कठडे तुटले आहेत.परिणामी विहिरीचे पाणी गाळ साचून दूषित होत आहे. भर मे महिन्यातही पाणीसाठा असलेल्या या विहिरीकडे प्रशासनाने लक्ष दिले असते तर शेजारील गावकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकले असते. शिवाय कठडे तुटलेल्या या विहिरीत एखादा मनुष्य किंवा प्राणी पडून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीने या विहिरीची दुरु स्ती करणे गरजेचे आहे. केवळ दुरु स्ती-देखभालीअभावी पाणी असूनही पिऊ शकत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत.पंचायत समितीने तात्काळ या विहिरीचा पंचनामा करु न पुढील कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.शहापूर तालुक्यात अनेक ठिकाणी गाळ साचून व मानवी चुकांमुळे नैसिर्गक जलस्रोत दूषित झाले आहेत किंवा लुप्त पावले आहेत. अशा ठिकाणी पाणीटंचाईच्या काळात तात्पुरता उपाय म्हणून टँकरने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.>पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतींच्या मदतीने दुषित व बंद पडलेले पाणीस्त्रोत शोधून त्यांचे पुनरु ज्जीवन करण्याची गरज आहे.- महेंद्र भेरे,सामाजिक कार्यकर्तेढोळकी विहिरीची डागडुजी केल्यास पाणी टंचाईचे प्रमाण कमी होईल. तसेच जलस्रोताचे संवर्धन केल्यास मुबलक पाणी उपलब्ध होईल.- कमळू मेंगाळ, अरविंद देशमुख, ग्रामस्थ डोंगरवाडी, ढाढरे>विहिरींमध्ये पाणी कमी असल्याने शेवाळे अधिक प्रमाणात जमा होते. त्यामुळे झºयांचे प्रमाणही कमी होते. मात्र, त्यासाठी ग्रामपंचायतीने विहिरींची स्वच्छता करणे आवश्यक आहे. - एम.बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग