शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाडमध्ये पाणीटंचाईमु‌ळे लग्न जुळणे कठीण; पाण्यासाठी महिलांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 23:09 IST

पाण्यासाठी महिलांची वणवण : रोजगारही बुडत असल्याची केली तक्रार, टँकरने पुरवठा सुरू

प्रकाश जाधवमुरबाड : खेडेगावात दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या गरिबाची सून होईन, पण घोटभर पाण्यासाठी भटकंती करायला लावणारा श्रीमंत नवरा नको अशी व्यथा पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिला व्यक्त करत आहेत. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील पाणीटंचाई असणाऱ्या गावातील तरुण, तरुणींनी जरी उच्च शिक्षण घेतले असले तरी लग्न जुळण्यास अडचणी येत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला तालुक्यातील सासणे, पाटगाव, वाघाची वाडी, बाटलीतील वाडी, तोंडली, साकुर्ली, साजई, तुळई, फांगणे, फांगुळ ग्रहात, आंबेमाळ, चिंचवाडी, वाल्हिवरे, थितबी या गावांतील पाणवठ्यांनी तळ गाठला असून गावात इतर सर्व सुविधा असलेल्या तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने १६ तास हे पाण्याच्या शोधात घालवावे लागतात. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार शोधावा की कोरड्या घशाला ओलावा देण्यासाठी पाणी शोधावे या विंवचनेत महिला सापडल्या आहेत.

दिसेल त्या पाणवठ्यावर महिलांचा घोळका दिसतो. सरकारने ग्रामीण आणि डोंगराळ भागात ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे त्या ठिकाणी कोट्यवधींच्या योजना राबविल्या, मात्र त्या योजना स्थानिक पुढाऱ्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचू न दिल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

डिसेंबर ते मे दरम्यान या भागात भेडसावणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी स्थानिक पातळीवर २४ गावे व ३८ पाडे अशा ६२ गावांचा टंचाई आराखडा तयार करून ५४ गावात आणि पाड्यात विंधन विहिरीचे काम प्रगतीपथावर आहे. टंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी मुरबाड तालुक्यात पाच टँकर पाणीपुरवठा विभागाने तैनात केले असले तरी ते टँकर टंचाईग्रस्त भागात पोहोचत नसल्यामुळे महिलांची भटकंती सुरूच आहे. सर्वत्र कोरोनाचे सावट असताना व भरउन्हात महिला वर्ग आपल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन पाण्यासाठी भटकंती करत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार