शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तार्इंच्या संपामुळे उपासमार, गरोदर मातांना अंगणवाडीतून दिला जाणारा आहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 03:21 IST

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा हा शंभर टक्के ग्रामीण आदिवासी भाग आहे. येथील कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असल्याची आकडेवारी बालविकास विभागाकडून नेहमीच पुढे येत आहे.

हुसेन मेनन जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा हा शंभर टक्के ग्रामीण आदिवासी भाग आहे. येथील कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असल्याची आकडेवारी बालविकास विभागाकडून नेहमीच पुढे येत आहे. तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे म्हणून शासन सर्वेतोपरी प्रयत्न करतांना दिसत आहे. मात्र, महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे कुपोषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे पालघर जिल्ह्यातील जव्हार, तालुक्यातील कुपोषणाचे प्रणाम वाढण्याचे चिन्ह आहे. याचा मोठा फटका कुपोषित बालके व गरोदर मातांना बसलेला आहे. तसेच गरोदर मातांना अंगणवाडीतून रोज दिला जाणारा आहार बंद झाल्याने कुपोषणाचे प्रणाम वाढणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.हे प्रमाण कमी व्हावे, म्हणून शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून, कुपोषित बालकांना व गरोदर मातांना आहार दिला जात आहे. परंतु अंगणवाडी सेविकांनी संप पुकारल्याने कुपोषित बालकांचा व गरोदर मातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढी संपामुळे याचा मोठा फटका कुपोषित बालकांना व गरोदर महिलांना बसणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.मात्र, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेल्यामुळे कुपोषित बालके व गरोदर मातांना आहाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अंगणवाडी बंद असल्यामुळे कुपोषित बालकांची होणारी तपासणी होणार नाही. त्यांना रोज दिला जाणारा आहार मिळणार नाही. तसेच बालक अतितीव्र कुपोषित असेल त्या बालकाला अंगणवाडी सेविका रु ग्णालयात तात्काळ दाखल करून उपचार केले जातात. मात्र, अंगणवाडी सेविकाच बेमुदत संपावर गेल्यामुळे कुपोषित बालकांचा व गरोदर मातांचे या काळात कुपोषण झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्याता असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे.>१५१ अंगणवाड्या १२,२५५ कुपोषितजव्हार बालविकास प्रकल्प-१ मध्ये अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्या असा एकुण १५१ अंगणवाड्या आहेत. तसेच साखरशेत बालविकास प्रकल्प-२ मध्ये अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्या असा एकूण- १९१ अंगणवाड्या आहेत. असा तालुक्यातील २४२ अंगणवाड्या असून, सर्वसाधारण कुपोषित बालके ७ हजार १०७ आहेत. तर मध्यम कुपोषित बालके ५ हजार ११८ अशी एकूण-१२ हजार २२५ कुपोषित बालके आहेत.