शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरारमधील पाऊस व पुरामुळे नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 03:23 IST

वसई-विरारमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून फ्रीज, टिव्ही, दुचाकी वाहने, कार, फर्निचर आदी वस्तू तसेच जीवनावश्यक बाबी यांचे मोठे नुकसान झाले.

विरार : वसई-विरारमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून फ्रीज, टिव्ही, दुचाकी वाहने, कार, फर्निचर आदी वस्तू तसेच जीवनावश्यक बाबी यांचे मोठे नुकसान झाले. पाऊस गेल्यानंतर देखील अनेक परिसरातील सोसायटी मध्ये पाणी होते. तळमजल्यावर राहणाऱ्या लोकांचे तर हाल झाले. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बिछाने, अन्न-धान्याची नासाडी झाली. जवळपास वसई विरार मधील ३०० बिल्डींगमध्ये पाणी जाऊन त्यातील रहिवाशांचे ५० हजार ते दोन लाखापर्यंतचे नुकसान झाले. त्यामुळे पालिकेने त्यांना भरपाई देण्याचे ठरवले आहे.घरात ४ दिवस पाणी असल्याने फ्रीज खराब झाला, तर मुलीच्या लग्नासाठी घेतलेला सोफा देखील पाण्यात भिजून खराब झाला. घरातले किंमती सामान आता निकामी झाल्याने ते भंगारमध्ये विकण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर घरातील लग्न देखील आता पुढे ढकलावे लागणार आहे असे किशोर पंडित यांनी सांगितले. बॉक्समध्ये पाणी गेल्याने मीटर पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यामुळे नवीन मीटर लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, तोपर्यत अनेक नागरिकांना अंधारातच खितपत पडावे लागणार आहे असे जयेश जोशी यांनी सांगितले.>नुकसान लाखोंचे, भरपाई मात्र काही हजारांची मिळणारवसई तालुक्यात काही कोटींच्या वर नुकसान झाले असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तहसीलदार नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांचे पंचनामे करत आहे. नागरिकांना पाच हजार, दहा हजार भरपाई दिली जाणार आहे. मात्र लाखोंचे नुकसान झाले असतांना त्याची भरपाई पाच आणि दहा हजारात कशी होणार? हा विचार कोणी केला नाही. मध्यमवर्गीयांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्याचप्रमाणे, पंचनाम्यासाठी लोकांनी घराबाहेर ठेवलेल्या सामानाला आता दुर्गंधी येणे सुरु झाले आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे, यावर उपाय करावेत असे, गोसावी म्हणाले.