शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

एमआयडीसीने वॉटर कनेक्शन न दिल्याने अद्ययावत शौचालय ६ महिने पडून

By admin | Updated: January 23, 2017 05:12 IST

तारापूर एम आय.डी.सी मधील कॅम्लीन नाक्यावर जेएसडब्ल्यूने उभारलेल्या स्टेनलेस स्टीलच्या अद्यावत शौचालयाला एमआयडीसीने

पंकज राऊत / बोईसर तारापूर एम आय.डी.सी मधील कॅम्लीन नाक्यावर जेएसडब्ल्यूने उभारलेल्या स्टेनलेस स्टीलच्या अद्यावत शौचालयाला एमआयडीसीने पाणी पुरवठा देण्यास विलंब लावल्याने ते सहा महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानालाच एमआयडीसीने तिलांजली दिली आहे. एमआयडीसीनेच हे शौचालयाचे उभारण्याकरीता प्लॉट उपलब्ध करून दिल्यानंतर जेएसडब्ल्यूने सुमारे ४५ लाख खर्चून ते उभारले. मात्र त्याला लागणाके वॉटर कनेक्शन देण्याचा प्रस्ताव लाल फितित अडकल्याने ते तसेच पडून आहे. उभारलेल्या या संकुलावर सौजन्य जेएसडब्ल्यू बरोबर एमआयडीसीचेही नाव ठळकपणे लिहिले आहे. पाणी पुरवठयाचा हा प्रश्न व त्यातील तांत्रिक अडचणी एमआयडीसीने सोडविला असता तर हा विलंब निश्चितपणे टाळता आला असता तर या अद्यावत सुलभ शौचालयाचा विनामूल्य वापर स्त्री, पुरु ष आणि अपंगानाही करता येणार असून सदर शौचालयात इंडियन आणि कमोड पॉट बरोबरच यूरिनसाठी असलेले भांडेही उच्च प्रतिच्या स्टेनलेस स्टीलचे आहे त्यामुळे ते कायम स्वछ राहणार असून सर्वांच्या सोयीचा आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असा उपक्र म आहे. तारापूर एमआयडीसीमधील कॅम्लीन नाका हा औद्योगिक वसाहतीतिल मुख्य रस्त्यावरील मध्यवर्ती असलेला सर्वात रहदारीचा असून त्यावर मालवाहतूक करणाऱ्या छोट्या- मोठ्या टेंपो, अवजड क्रेनच्या वाहनतळ बरोबरच सहा व तीन सिटर रिक्षा आणि एसटी बसचाही स्टॉप असल्याने त्या नाक्यावर माणसांची प्रचंड प्रमाणात ये जा असते त्यामध्ये महिला प्रवासी संख्याही जास्त असते. या नाक्यावर स्वच्छ्तागृहा अभावी पुरूषां बरोबरच स्त्रियांचीही मोठी कुचंबणा होत असल्याने त्यांना एक चांगली सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने तसेच स्वच्छता भारत अभियानाला हातभार लागावा, या स्वच्छ हेतूने उभारलेले सुलभ शौचालय सहा महिन्या पासून धूळ खात पडल्याने सर्वत्र संताप व आश्चर्य व्यक्त करण्यांत येत आहे. या संदर्भात जेएसडब्ल्यू स्टील च्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी सदर सुलभ शौचालय लवकरच सुरु करण्यात येईल एवढेच सांगितले.