शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणमुळे कोलदा तहानला

By admin | Updated: March 5, 2017 02:28 IST

मोरहंडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या कोलद्याचा पाडा येथील नळपाणी पुरवठा योजना वीजमीटर जोडणी अभावी बाळगली असल्याने मोखाड्यातील महावितरणाचा

- रविंद्र साळवे, मोखाडा

मोरहंडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या कोलद्याचा पाडा येथील नळपाणी पुरवठा योजना वीजमीटर जोडणी अभावी बाळगली असल्याने मोखाड्यातील महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.३७६ लोकसंख्या असलेल्या कोलदयाच्या पाडा येथील ग्रामस्थांना दरवर्षीच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. रणरणत्या उन्हात कोसोमैल अंतर तुडवत येथील आदिवासींना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यामुळे येथील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीने पेसा अंतर्गत ७ लाख निधी खर्च करण्याचे एकमताने ठराव मंजूर करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मोखाडा महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे वीज मीटरची जोडणीच केली जात नसल्याने येथील नळपाणी पुरवठा योजना राबविण्याचे स्वप्न हवेत विरले आहे. तारीख पे तारीखया नळपाणी पुरवठा योजनेच्या वीज मीटर जोडणीसाठी १५ ते २० पोल लागणार आहेत याची सर्व पूर्तता लवकरच करून मंजुरी दिली जाणार आहे अशी महिती कनिष्ठ अभियंता शशांक टोरपे यांनी दिली आहे.खासदारांच्या पत्रालाही केराची टोपलीवर्ष २०१३ पासून येथील ग्रामस्थ मोखाडा महावितरण कार्यालयाचे हेलपाटे मारत आहेत. मे २०१६ मध्ये खासदार चिंतामण वनगा यांनी यांनी सुद्धा मुख्यकार्यकारी अधिकारी महावितरण पालघर व मोखाडा यांना पत्रव्यवहार करून देखील अजून पर्यत याची दखल घेतलेली नाही.