शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या कारवाईमुळे रेती व्यावसायिकांचा बेमुदत बंद

By admin | Updated: October 24, 2015 23:18 IST

गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या रेती व्यावसायिकांनी सतत होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला आहे. रेती वाहतुकीचे परवाने ज्यांच्याकडे नाहीत, अशांवर

वसई : गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या रेती व्यावसायिकांनी सतत होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला आहे. रेती वाहतुकीचे परवाने ज्यांच्याकडे नाहीत, अशांवर महसूल विभागातर्फे दंड आकारण्यात येत असल्यामुळे या व्यावसायिकांनी बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे. बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट असतानाच रेतीचा पुरवठा बंद झाल्यामुळे वसई, विरार, ठाणे, पालघर परिसरातील बांधकाम व्यवसाय पूर्णपणे कोसळण्याची चिन्हे आहेत. पर्यावरणाच्या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयाने वसई, पालघर, भिवंडी भागात होणाऱ्या रेती उत्खनन व्यवसायावर निर्बंध टाकले आहेत. त्यामुळे गेली ४ वर्षे रेती व्यवसाय मंदीच्या सावटाखाली आहे. दरम्यान, महसूल विभागाने अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची पथके निर्माण केली आहेत. दिवसा महसूल व पोलीस अधिकारी यांचा ससेमिरा मागे लागतो म्हणून व्यावसायिक रात्रीच्या वेळी रेतीची वाहतूक करीत असतात. सदर बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने रेतीस्थळ परिसर व मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पथके तैनात केली. गेल्या ३ महिन्यांत महसूल विभागाने रेतीस्थळावर साचलेला रेतीचा साठा व अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांवर कारवाई करून कोट्यवधी रुपयांचा दंड आकारला आहे. त्यामुळे रेती व्यावसायिकांनी आता बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे. बंदच्या दबाव अस्त्रामुळे महसूल प्रशासनावर काय परिणाम होतो हे पहाणे औत्सूक्याचे ठरेल. (प्रतिनिधी)